प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्र राजय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उद्यापासून बारावीची (SSC) ची परिक्षा सुरु होणार आहे. यंदाच्या परिक्षेसाठी राज्यातून 14 लाखांच्यावर विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत. तर बोर्डाच्या परिक्षा सुरु होण्यापूर्वी विविध सुचना विद्यार्थ्यांसह पालकांना देण्यात येते. एवढेच नव्हे तर पालकांनी विद्यार्थ्यांवर जास्त ताण न देण्याची सल्ला सुद्धा दिला जातो. उद्यापासून सुरु होणाऱ्या परिक्षेसाठी विद्यार्थी जोरदार तयारी करुन येताना दिसून येतात. तसेच परिक्षेला पोहचण्यापूर्वी हॉलतिकिटसह अन्य गोष्टींची काळजी घेण्याचे ही सुचना दिली जात आहे. तर याच पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी पालकांपासून ते राजकीय नेत्यांनी विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

बारावीची परिक्षा सुरु होण्यापूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून परिक्षा द्या असे आवाहन कले आहे.

शैक्षणिक वाटचालीत दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा हा महत्त्वाचा टप्पा. उच्च शिक्षणात पदार्पण करण्यासाठी बारावीची परीक्षा ही महत्वाची पायरी असल्याचे म्हटले आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या बारावीची परीक्षा देणाऱ्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.(Maharashtra HSC Hall Ticket 2020: महाराष्ट्र बोर्ड 12वी च्या विद्यार्थ्यांना आजपासून मिळणार हॉलतिकीट; mahahsscboard.in वर करू शकता डाऊनलोड)

शैक्षणिक वाटचालीत दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा हा महत्त्वाचा टप्पा. उच्च शिक्षणात पदार्पण करण्यासाठी बारावीची परीक्षा ही महत्वाची पायरी. उद्यापासून सुरू होणाऱ्या बारावीची परीक्षा देणाऱ्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री अनिल परब यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत.

तर 9771 कनिष्ठ महविद्यालयात ही परीक्षा होणार आहे. परीक्षा पारदर्शी होण्यासाठी आणि गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके, बैठे पथके यांचा केंद्रावर अंकुश असणार आहे. जर गैरप्रकार करताना कोणता विद्यार्थी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षा व्यवस्थित पार पडाव्यात यासाठी शिक्षण विभागाने आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.