Dattatray Bharane | (Photo Credits: Facebook)

सार्वजनिक ठिकाणी जनतेला सर्वजन सारखेच. त्यात जर एखाद्याची ओळख पटली नाही तर जनता तिला हवे ते काम संबंधिकाकडून करुन घेऊ शकते. अर्थात मानसात नम्रता असली की मी पण बाजूला पडते हेही खरेच. महाविकासआघाडी सरकारमधील राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्यासोबत असाच काहीसा प्रकार घडला. राज्यातील मंत्री चक्क सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे फोटो काढताना दिसला. कोपरगावचे (Kopargaon) आमदार अशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी हा प्रसंग आपल्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंट्सवर शेअर केला आहे.

काय घडले नेमके?

विधिमंडळ अधिवेशन 2020 कामकाज संपल्यानंतर भरणे मामा मुंबई येथील प्रसिद्ध ठिकाणी मरीण ड्राईव्ह येथे फेरफटका मारत होते. या वेळी मरीन ड्राईव्ह येथे फिरायला आलेल्या काही मंडळींना आपली छबी टीपण्याचा मोह झाला. आता या मंडळींना फोटो काढायचा होता. पण, काढणार कोण? अशा वेळी मंत्री दत्तात्रय भरणे यांना या मंडळींना पाहिले. अर्थात हे मंत्री महोदय आहेत याची सूतराम कल्पना त्यांना नव्हती. त्यापैकी एकानेही त्यांना ओळखले नाही. त्यांनी चक्क 'ओ काका.... आमचा फोटो काढा ना' असे म्हणत राज्यमंत्री भरणे यांच्या हातात कॅमेरा दिला. मग काय भरणे मामा यांनीही आपल्या पदाच्या पादूका बाजूला सारत सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे संबंधितांची छबी टीपली आणि उपस्थितांना खूश केले. कोपरगावचे आमदार अशुतोष काळे यांनी हा प्रसंग आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिला आहे.

अशुतोष काळे यांची फेसबुक पोस्ट

आज विधिमंडळाचे कामकाज आटोपल्यानंतर सायंकाळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मा.ना.श्री. दत्तात्रय भरणे मामा यांच्यासोबत मरीन ड्राईव्हला फेरफटका मारत असताना काही मुलांनी भरणे मामांना न ओळखता आमच्या ग्रुपचा फोटो काढता का म्हणून विचारणा केली. मामांनी लगेच त्या मुलांचा मोबाईल हातात घेऊन त्यांच्या ग्रुपचा फोटो काढला. त्यावेळी भरणे मामा मुलांचा फोटो काढत असताना त्यांचा फोटो काढण्याचा मोह मलाही आवरला नाही. महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्याचे मंत्रिपद सांभाळणाऱ्या भरणे मामांचा साधेपणा मी माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. (हेही वाचा, Fake News of PM Narendra Modi: मुकेश अंबानी यांच्या नातवाला भेटायला हॉस्पीटलमध्ये गेले पंतप्रधान नरेंद्र मोदी? पाहा व्हायरल फोटोमागील नेमके सत्य अर्थात Fact-Check)

मोठी माणसे उगाच मोठी होत नाहीत. पदाचा मोठेपणा मिरवण्यापेक्षा सामान्य माणसात सामान्य होऊन राहण्यात देखील मोठेपणा असतो. आदरणीय पवार साहेब यांच्याकडून ही गोष्ट नेहमी शिकायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेला प्रत्येक जण त्यांनी दिलेल्या विचारांनीच वाटचाल करत आहे यात शंका नाही.

दरम्यान, या प्रसंगानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची याच्याबाबत हटके चर्चा सुरु झाली आहे. तसेच, ते फोटो काढत असताना त्यांचा फोटोही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.