राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. ब्राम्हण समाजाशी निगडीत त्यांनी केलेले एक विधानाना त्यांच्या अडणचीत वाढ केली आहे. छगन भुजबळ यांनी एका संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना ब्राह्मण समाजाबद्दल विधान केलं. ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे ठेवत नाहीत, असं छगन भुजबळ म्हणाले. त्यांच्या या विधानावरून चांगलाच वाद निर्माण झाला असून ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे. छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी महंत सुधीरदास पुजारी यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ यांना समज द्यावी, यापुढे जर मंत्री छगन भुजबळ यांनी अशी विधाने केली, तर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, असंही महंत सुधीरदास पुजारी म्हणाले. भुजबळ यांना कानाखाली मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच कानाखाली देणाऱ्याला 1 लाख रुपये घोषणा करण्यात आली होती. या धमकीनंतर पोलीस विभागाकडून त्यांच्या सुरक्षेत करण्यात आली आहे.
ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे ठेवत नाहीत, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी वादग्रस्त विधान करणारे संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे. एका कार्यक्रम बोलताना भुजबळ यांनी हे विधान केलं होतं. त्याचबरोबर आम्ही कुठेही गेलो, तरी शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा अजिबात सोडणार नाही, असेही मंत्री भुजबळ म्हणाले होते.