मुंबईत (Mumbai) 1 सप्टेंबरपासून सुटे दूध महागणार (Milk Price Hike) आहे. एक लीटर म्हशीचे सुटे दूध रिटेलमध्ये 2 ते 3 रुपयांनी महाग (Mumbai Milk Price Hike) होण्याची शक्यता आहे. होलसेल दरातही 2 रुपयांनी वाढ होणार आहे. शनिवारी दूध विक्रेत्यांच्या बैठकीत हा महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जनावरांच्या चाऱ्याच्या दरात वाढ झाली असून, त्याचा परिणाम दूध उत्पादकांवर होत आहे. त्यामुळे याचा परिणाम आता दूधाच्या दरावरही होणार आहे. सध्या म्हशीच्या सुटे एक लीटर दूधाचा दर 85 रुपये आहे. हा दर आता 87 रुपये होईल, तर रिटेलला हे दूध 87 ते 88 रुपये होईल. (हेही वाचा - Khandoba Mandir: खंडोबा मंदिराचा गाभारा भाविकांसाठी 28 ऑगस्ट ते 5 ऑक्टोबर दरम्यान राहणार बंद)
एक लिटर म्हशीचे सुटे दुध रिटेलमध्ये 2 ते 3 रुपयांनी महागणार तर होलसेल दरातही 2 रुपयाने वाढ होणार आहे. मुंबई शहरात तीन हजाराहून अधिक दूध विक्रेते आहेत. जे ब्रॅन्डेड किंवा पॅकेटबंद दूध नसते, ज्याची विक्री सुट्या पद्धतीने केली जाते अशा दुधाच्या किमतीत वाढ होणार आहे. जनावरांच्या चाऱ्याचे भाव वाढले आहेत. चाऱ्याच्या दरात वाढ झाल्याने याचा परिणाम दूध उत्पादकांवर होत आहे. मुंबईतील सर्व दूध विक्रेत्यांची बैठक पार पडली, त्याबैठकीत दूध दरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.