प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

MHT CET Exam 2020 Result Date:  ऑक्टोबर/नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या MHT CET Exam 2020 च्या निकालांकडे परीक्षार्थ्यांचे लक्ष लागले होते. अखेर काल (26 नोव्हेंबर) रात्री उशिरा उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यंदा एमएचटी सीईटीचा निकाल 5 डिसेंबरला लागणार असल्याचं जाहीर केले आहे. या दिवशी इंजिनियरिंगच्या (Engineering)  विद्यार्थ्यांसोबतच लॉ (Law)आणि BEd अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे देखील निकाल जाहीर केले जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून दिली आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना cetcell.mahacet.org किंवा mhtcet2020.mahaonline.gov.in. या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल तर केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल. अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. जाणून घ्या यंदाच्या सीईटी निकाला विषयी काही महत्त्वाच्या अपडेट्स.

उदय सामंत ट्वीट

कसा पहाल MHT CET Exam 2020 चा निकाल ?

  • MHT CET च्या अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org ला भेट द्या.
  • होम पेज वर MHT CET result वर क्लिक करा.
  • नव्या विंडोमध्ये तुम्हांला लॉगिन क्रेडिनशियल्स टाकावे लागतील.
  • आता तुम्हांला निकाल स्क्रीनवर पाहता येईल.
  • दरम्यान त्यानंतर निकालाची प्रत डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट काढून ठेवा.

 

दरम्यान 5 डिसेंबरला जाहीर होणारे निकाल हे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे असतील. MHT CET ची आन्सर की 10 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य सीईटी सेलने सांगितले. एमएच सीईटी परीक्षा राज्यभरातील अनेक ज्युनिअर कॉलेजद्वारे घेण्यात आल्या होत्या. 1 ते 9 आणि 12 ते 20 ऑक्टोबर दरम्यान या परीक्षा पार पडल्या. मात्र त्या काळातील असलेल्या संकटांमुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी 7 नोव्हेंबर रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात आली होती.