online ((Photo Credits: Pexels)

Maharashtra state Common Entrance Test कडून आज (21 सप्टेंबर) MHT CET च्या पीसीबी ग्रुप ची हॉल तिकीट जारी करण्यात आली आहेत. ही अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org ला भेट द्यावी लागेल. याकरिता तुम्हांला अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि बर्थ डेट/जन्मतारीख द्यावी लागणार आहे. आजपासून इंजिनियर च्या सीईटी परीक्षांना सुरूवात झाली आहे. ही परीक्षा 1 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.

परीक्षेला जाताना तुम्हांला अ‍ॅडमीट कार्ड घेऊन जाणं आवश्यक आहे. या हॉलतिकीटावर परीक्षा केंद्र, वेळ आदी तपशील असणार आहेत. नक्की वाचा: Maharashtra CET 2021 Exam Date: महाराष्ट्र सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर; mahacet.org वर पहा संपूर्ण वेळापत्रक.

कसं कराल हॉल तिकीट डाऊनलोड?

  • MHT CET Admit Card डाऊनलोड करण्यासाठी cetcell.mahacet.org ला भेट द्या.
  • होम पेज वर MHT CET admit card 2021 download link पहा.
  • अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिंग करा.
  • सबमीट केल्यानंतर तुम्हांला तुमचं अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड साठी उपलब्ध होईल.
  • या हॉलतिकीटाची प्रिंट आऊट काढता येऊ शकते.

या डिरेक्ट लिंक द्वारा देखील तुमचं हॉलतिकीट डाऊनलोड करता येऊ शकतं.

सीईटी परीक्षेला जाताना तुम्हांला हॉल तिकीट सोबत ठेवणं आवश्यक आहे. याशिवाय परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. यंदा कोविड 19 च्या प्रादुर्भावाखाली परीक्षा होत असल्याने सुरक्षित वातावरणामध्ये परीक्षा व्हावी याकरिता विशेष नियमावली तयार करण्यात आली आहे. त्याची देखील माहिती आता अ‍ॅडमीट कार्ड वर असेल त्यामुळे ती देखील वाचून त्याचं पालन करणं आवश्यक आहे.