MHT CET 2020 Exam: मुंबईतील वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरातील 5 केंद्रावरील एमएचटी सीईटी परीक्षा घेण्यास अडथळा; परीक्षेचे नवीन तारीख आणि सूचना जाणून घेण्यासाठी mahacet.org वर क्लिक करा
Representational Image (Photo Credits: PTI)

MHT CET 2020 Exam: सोमवारी मुंबईत वीज पुरवठा खंडित (Mumbai Power Cut) झाल्याने अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी परीक्षेत (MHT CET 2020 Exam) अडथळा आला. 12 ऑक्टोबर पासून 20 ऑक्टोबर 2020 पर्यंत पीसीएम ग्रुपची परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, सोमवारी मुंबई शहरातील वीज पुरवठ्यात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सीईटी परीक्षेचे आयोजन करणार्‍या शहरातील 5 केंद्रांवर परिणाम झाला. त्यामुळे या केंद्रावरील परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सीईटी सेलने माहिती दिली होती. याशिवाय रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने या पाच सेंटरवरील उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अडथळा आला.

एमएचटी सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, सीईटी सेलने पुन्हा या केंद्रांच्या उमेदवारांसाठी प्रवेश परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. या उमेदवारांसाठी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा 20 ऑक्टोबर रोजी किंवा त्यापूर्वी घेण्यात येईल. हे उमेदवार mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नवीन परीक्षेची तारीख आणि वेळ तपासू शकतात. तथापी, या विद्यार्थ्यांना परीक्षेची नवीन तारीख व वेळ सीईटी सेलमार्फत एसएमएस किंवा ईमेलद्वारे पाठवण्यात येईल. (हेही वाचा - Mumbai Power Cut: मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघरमधील वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे ऑनलाईन परीक्षेमध्ये अडथळा; विद्यार्थ्यांनी केली ट्विटरवर तक्रार)

MHT CET 2020 प्रभावित केंद्रांची नावे -

  • ठाकूर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय (Thakur College of Engineering and Technology)
  • ठाकूर इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च (Thakur Institute of Management Studies Career Development and Research)
  • ठाकूर व्यवस्थापन अभ्यास व संशोधन संस्था (Thakur Institute of Management Studies and Research)
  • बाबासाहेब गावडे तंत्रज्ञान संस्था (Babasaheb Gawde Institute of Technology)
  • डॉन बॉस्को सेंटर फॉर लर्निंग (Don Bosco Center for Learning)

वरील परीक्षा केंद्रांवरील सर्व उमेदवारांनी सीईटी पीसीएम परीक्षेची नवीन तारीख व वेळ त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर mhtcet2020.mahaonline.gov.in वर लॉग इन करून तपासावा. सीईटी परीक्षा संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार राज्य सीईटी सेलच्या Mahacet.org वर सूचना पाहू शकता.