MHADA Lottery | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई म्हाडा लॉटरी (MHADA Lottery 2024) अंतर्गत वाटप केल्या जाणाऱ्या घरांच्या किमतीमध्ये (Mumbai Housing Scheme) राज्य सरकारने लक्षणीय कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया मंच एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली. किमतीतील कपात विशेषत: कलम 33(5) आणि 33(7) अंतर्गत अधिग्रहित केलेल्या अतिरिक्त सदनिकांना लागू असेल. उपमुख्यमंत्र्यांनी सरकारी निर्णयाची माहिती देताना सांगितले की, “सध्याच्या मुंबई लॉटरीसाठी घोषित किमतीवर म्हाडाच्या घरांच्या किमतीत कपात (MHADA Reduces Cost of Homes in Mumbai Lottery) करण्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. हा निर्णय फक्त कलम 33(5) आणि 33(7) अंतर्गत मिळालेल्या अतिरिक्त सदनिकांना लागू होते.” सुधारित किमतीतील कपात खाली येथे देण्यात आली आहे.

म्हाडा घरांच्या किमतीत कपात, पण किती?

देवेंद्र फडणवीस यांनी X वरील एका पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने सध्याच्या म्हाडा मुंबई लॉटरीसाठी घोषित किमतीवर म्हाडाच्या घरांच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. किंमत कपातीचा निर्णय केवळ फक्त कलम 33(5) आणि 33(7) अंतर्गत मिळालेल्या अतिरिक्त सदनिकांना लागू आहे.” सुधारित किमतीतील कपात पुढीलप्रमाणे आहेत.

  • आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (EWS): 25% कपात
  • निम्न उत्पन्न गट (LIG): 20% कपात
  • मध्यम उत्पन्न गट (MIG): 15% कपात
  • उच्च उत्पन्न गट (HIG): 10% कपात

घरांचे वाटप लॉटरी पद्धतीने

म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी माहिती देताना सांगितले की, या गृहनिर्माण युनिट्सची लॉटरी येत्या काही दिवसांत अंतिम घोषणेसह सप्टेंबरमध्ये काढणे अपेक्षित आहे. या योजनेंतर्गत फ्लॅट्स मुंबईतील मालाड, पवई, विक्रोळी, गोरेगाव आणि वडाळा या प्रमुख ठिकाणी उपलब्ध असतील. म्हाडाने देखील पुष्टी केली की घरांचे वाटप लॉटरी पद्धतीने केले जाईल, निकाल 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाईल. गृहनिर्माण सोडतीसाठी अर्ज 9 ऑगस्टपासून सुरू झाले, आणि अंतिम मुदत 19 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत, 30,000 हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत, अनेक अर्जदारांनी आधीच बयाणा ठेव (EMD) भरली आहे. (हेही वाचा, Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी सोडतीपूर्वी वेबिनारचे आयोजन, गृहनिर्माण संस्थेकडून 'अधिकृत संकेतस्थळ'च वापरण्याचा सल्ला; कारणही घ्या जाणून)

2023 च्या म्हाडा मुंबई लॉटरीमध्ये 100,000 हून अधिक अर्ज आले आहेत. तथापि, अधिका-यांनी नमूद केले की बहुतेक अर्ज अंतिम मुदतीपूर्वी अंतिम दिवसांत सादर केले जातात, ज्यामुळे नवीन अर्जदारांसाठी पुरेसा वेळ मिळतो.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून X पोस्टद्वारे माहिती

म्हाडा गृहनिर्माण योजना 2024: पात्रता निकष

  • EWS (आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग): कौटुंबिक उत्पन्न प्रति वर्ष ₹6 लाखांपर्यंत.
  • LIG (कमी उत्पन्न गट): कौटुंबिक उत्पन्न ₹6 लाख ते ₹9 लाख प्रति वर्ष.
  • MIG (मध्यम उत्पन्न गट): कौटुंबिक उत्पन्न ₹9 लाख ते ₹12 लाख प्रति वर्ष.
  • HIG (उच्च उत्पन्न गट): कौटुंबिक उत्पन्न प्रति वर्ष ₹12 लाखांपेक्षा जास्त.

म्हाडा गृहनिर्माण योजना 2024: आवश्यक कागदपत्रे

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र
  • रद्द केलेला चेक
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • पासपोर्ट आकाराची छायाचित्रे
  • जन्माचा दाखला

दरम्यान, अधिक माहिती आणि गृहनिर्माण योजना आणि अर्ज प्रक्रियेबाबत माहितीसाठी अर्जदार म्हाडाशी संपर्क साधू शकतात.