MHADA Mumbai Division Lottery 2019: 2 जूनला 217 म्हाडा घरांसाठी निघणार सोडत; आज पहा lottery.mhada.gov.in वर पात्र अर्जदारांची यादी
Mhada Lottery | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबईमध्ये सामान्यांचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा सोडत जाहीर करते. यामध्ये मुंबईत यंदा 217 घरांसाठी 66 हजाराहून अधिक लोकांनी आपला अर्ज दाखल केला आहे. 2 जून दिवशी मुंबईतल्या घरांसाठी सोडत निघणार आहे. यंदा लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे सोडतेच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. पात्र ठरलेल्या अर्जदारांची नावं 30 मेला म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. तर 2 जूनला वांद्रे येथे म्हाडा भवनामध्येच लॉटरी काढण्यात येणार आहे.

म्हाडा लॉटरी 2019 मध्ये पात्र उमेदवारांची यादी कुठे पहाल?

  • lottery.mhada.gov.in ओपन करा.
  • या संकेतस्थळावर तुम्ही ज्या ठिकाणी (मुंबई) लॉटरीच्या घराचा अर्ज भरला आहे त्यावर क्लिक करा.
  • मेन्यु बार वर तुम्हांला Accepted Applications वर क्लिक करा.
  • त्यानंतर लॉटरी रिझल्टची लिंक ओपन होईल.
  • तुमच्या स्कीम नंबर आणि कॅटेगरीनुसार नाव तपासून पहा.

मुंबईमध्ये 217 पैकी 47 मध्यम उत्पन्न गटासाठी आहेत. उर्वरित 170 घरं ही अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. ही घर पवई (46) व चेंबुर परिसरात आहेत. मुंबई सोबत नाशिक, औरंगाबाद, पुणे शहरामध्ये म्हाडाच्या घरांसाठी सोडत निघणार आहे.