Mhada Lottery | (Photo credit: archived, edited, representative image)

Mhada Lottery for Mumbai, Pune,Nashik,Aurangabad and Konkan Zone: तुम्ही मुंबईकर, पुणेकर, नाशिककर असाल तर तुमच्यासाठी गृहस्वप्नपूर्तीयोग जुळून येऊ शकतो. कारण, लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या तिन्ही ठिकाणांसाठी म्हाडाच्या घरांची लॉटरी निघणार आहे. म्हाडाच्या अध्यक्षांकडून याबबात घोषणाही झाली असून, या तिन्ही ठिकाणच्या नागरिकांना आपल्या स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा आनंद म्हाडामुळे उपलब्ध होणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात गृहपूर्ती हाच म्हाडाचा उद्देश असल्याने घरांसाठी म्हाडा लॉटरी कधी निघते याकडे सर्वसामान्य डोळे लाऊन बसलेले असतात.

हजारो घरांसाठी निघणार म्हाडाची लॉटरी

प्राप्त माहितीनुसार, मुंबई, पुणे आणि नाशिक या ठिकाणांसाठी म्हाडाच्या घरांची लॉटरी निघणार आहे. या तिन्ही ठिकाणांसाठी अनुक्रमे २३८ , ४४६४ आणि 1,000 घरांसाठी लॉटरी निघणार आहे. दरम्यान, मुंबईमध्ये १०७ गाळ्यांसाठी म्हाडा लॉटरी काढणार आहे. (हेही वाचा, म्हाडा: एक व्यक्ती, एक घर, एक कुटुंब; तब्बल 83 अर्ज)

औरंगाबादकरांनाही खुशखबर

दरम्यान, केवळ मुंबई, पुणे, नाशिक या तीन ठिकाणच नव्हे तर, औरंगाबादसाठीसुद्धा म्हाडाची लॉटरी निघणार आहे. औरंगाबादसाठी एकूण 800 घरांसाठी लॉटरी निघणार आहे. (हेही वाचा, MHADA Vigilance Helpline Number : घराचं आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या एजंटांच्या तक्रारीसाठी खास हेल्पलाईन सुरु)

कोकण विभागाकडेही म्हाडाचे लक्ष

कोकण विभागाकडेही म्हाडाचे लक्ष असून, अचारसंहीता संपल्यानंतर अल्पावधीतच कोकण विभागातील सुमारे 9,000 घरांसाठी म्हाडाची लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.