MHADA | Facebook

मुंबई मध्ये सर्वसामान्यांना हक्काचं घरं घेण्यासाठी 'म्हाडा' (MHADA) हा एक पर्याय आहे. रिअल ईस्टेट च्या वाढत्या किंमतींमध्ये मुंबईत घर हे अनेक सामान्य नागरिकांसाठी स्वप्नचं राहते. पण सकाळ शी बोलताना म्हाडाचे सीईओ संजीव  जयस्वाल (Sanjeev Jaiswal) यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच म्हाडाची घरांसाठी लॉटरी जाहीर होणार आहे. तसेच 8-10 दशकाहून जुनी मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुर्नविकासासाठी एक्झिट पॉलिसी तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती देण्यात आली आहे. 2 वर्षांमध्ये जुन्या इमारतींचा पुर्नविकास होणार असून जुन्या मुंबईकरांना आता इथेच घरं मिळणार आहेत.

म्हाडाकडून ऑगस्ट, सप्टेंबर 2025 मध्ये 3 ते 4 हजार घरांसाठी लॉटरी निघणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सेस इमारतींचा म्हाडा करणार पुन्हा विकास

पूर्वी सेस इमारतींचा पुन्हा विकास करण्यासाठी मालक आणि भाडेकरू यांची परवानगी आवश्यक होती पण आता राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार, मुंबई मध्ये सहा महिन्यात प्रस्ताव सादर न केल्यास म्हाडा इमारतींचा पुन्हा विकास करू शकते. रखडलेले पुर्नविकास प्रकल्प विकासकांकडून म्हाडा त्यांच्या ताब्यात घेऊ शकते.

मुंबई मध्ये 13 हजार इमारतींच्या पुर्नविकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. 2-3 वर्षांमध्ये सेस इमारतींचा पुर्नविकासाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सध्या 1200 सेस इमारतींचा पुर्नविकास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. Mhada Fake Website: सावधान! सायबर ठगांनी बनवली हुबेहुब म्हाडासारखीच वेबसाईट .

रेडी रेकनर दरामध्ये वाढ

1 एप्रिल 2025 पासून सरकारने राज्यातील रेडी रेकनरच्या दरात सरासरी 4.39 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे राज्यात घर आणि मालमत्ता खरेदी करणं आणखी महाग झाले आहे. शहरी  भागात ही वाढ 5.95 टक्के तर ग्रामीण भागात ही वाढ 3.36 टक्के असणार आहे‌.