Exam | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Maharashtra SET Exam 2020 Date:  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (SPPU) अधिकृत संकेतस्थळावर आज (18 नोव्हेंबर) SET exam date 2020 जाहीर केली आहे. दरम्यान ही परीक्षा कोविड 19 संकटामुळे पुढे ढकलण्यात आली होती पण अखेर आता जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार 27 डिसेंबर दिवशी होणार आहे. ज्या परीक्षार्थींनी Maharashtra SET examination साठी रजिस्टर केले आहे त्यांना परीक्षेचे वेळापत्रक setexam.unipune.ac.in वर ऑनलाईन पाहता येणार आहे. Savitribai Phule Pune University च्या पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षा प्रश्नावलीत PoK चा आक्षेपार्ह उल्लेख, चूक लक्षात येताच पुणे विद्यापीठाकडून माफी मागत संबंधित विभागाकडून स्पष्टीकरण मागवल्याची माहिती.

महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी पुणे विद्यापीठाकडून सेट परीक्षा घेतली जाते. यापूर्वी ही परीक्षा 28 जून 2020 ला आयोजित करण्यात आली होती, परंतू कोविड 19 संकटामुळे ती पुढे ढकलली गेली होती. अखेर आता Registrar and Member Secretary of SET examination कडून या परीक्षेचं नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन !

महाराष्ट्र सेट (Maharashtra SET)किंवा MH SET Exam ही महाराष्ट्र आणि गोवा राज्यात कॉलेज, विद्यापीठांमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणार्‍यांसाठी घेतली जाते. ऑफलाईन किंवा पेन पेपर मोडमध्ये ही परीक्षा घेतली जाते.पहिला पेपर एक तासाचा तर दुसरा 2 तासाचा असतो. पेपर 1 मध्ये 50 प्रश्न असतात तर पेपर 2 मध्ये 100 प्रश्न असतात.