Megablock (Photo Credits:Twitter)

मुंबईची लाईफलाईन म्हणुन ओळखल्या जाणार्‍या लोकलचा वेग रविवारी मात्र मेगाब्लॉक मुळे मंदावला जातो. येत्या रविवारी म्हणजेच उद्या 22 डिसेंबर रोजी सुद्धा प्रवाशांना या लोकलच्या दिरंगाईचा त्रास सहन करावा लागणार आहे. प्राप्त माहितीनुसार,उद्या मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गांवर विविध तांत्रिक कामानिमित्त सकाळपासून मेगाब्लॉकचे (Megablock) नियोजन करण्यात आले आहे. यामुळे लोकलच्या काही फेऱ्या रद्द राहतील तर अन्य ठिकाणी लोकलचा उशिराने धावणार असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे.

मध्य रेल्वे वर माटुंगा (Matunga) ते मुलुंड (Mulund) तर हार्बर मार्गावर चुनाभट्टी /वांद्रे - CSMT स्थानकात तसेच पश्चिम मार्गावर  बोरिवली (Borivali)  ते भाईंदर (Bhayandar) या स्थानकांच्या मध्ये ब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे.  या मेगाब्लॉकचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या..

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकाच्या डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.30 ते 3.00 या वेळेत ब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. परिणामी या मार्गावरील लोकलफेऱ्या या 20 ते 25 मिनिटे उशिराने असणार आहेत.

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वे मार्गावर चुनाभट्टी/वांद्रे- सीएसएमटी स्थानकाच्या दरम्यान डाऊन मार्गावर 11.10 ते 4.10 दरम्यान तर तर सीएसएमटी- चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर 11.10 ते 3.40 या वेळेत ब्लॉक असणार आहे. याशिवाय, सकाळी 11.34 ते दुपारी 4.20 पर्यंत सीएसएमटी/वडाळा ते वाशी/बेलापुर/पनवेल  मार्गावरील लोकल फेऱ्या पूर्णतः बंद असतील मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला- पनवेल अशा विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्या नियमित तिकिट/ पास वर प्रवासी या मार्गावरून प्रवास करू शकतील.

पाहा ट्वीट

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे वर आज सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान बोरिवली ते भाईंदर दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळेत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून अन्य गाड्या या बोरिवली- भाईंदर दरम्यान जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.

मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या ब्लॉक दरम्यान प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे असा सल्ला रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे.