Megablock (Photo Credits:Twitter)

मुंबईकरांनी रविवारी प्रवास करायचं म्हंटल की सगळ्यात आधी एक गोष्ट विचारात घ्यावी लागते ती म्हणजे मेगाब्लॉक (Megablock) आज , म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी सुद्धा मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर म्हणजेच मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या वेळेत रेल्वे रुळांची दुसृष्टी, सिग्नल यंत्रणा तपासणी इत्यादी कामे केली जातील . मध्य मार्गावरील (Central Railway) मेगाब्लॉक सकाळी 11.15 मिनिटांनी सुरु होणार असून दुपारी 3.45 वाजेपर्यंत असणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील भायखळा (Byculla) ते विद्याविहार (Vidyavihar)  मार्गावर होणार आहे, तर पश्चिम मार्गावरील (Western Railway) वसई रोड (Vasai Road) ते भाईंदर (Bhainder) स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडील रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असेल. हार्बर मार्गावरील (Harbour Railway)  लोकल ब्लॉक दरम्यान रद्द करण्यात येणार आहेत.

ब्लॉकमुळे प्रवाशांना रेल्वेची वाट पाहावी लागणार आहे, त्यामुळे खोळंबा वाचवण्यासाठी वेळापत्रक पाहून त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे असे रेल्वे तर्फे सांगण्यात आले आहे.  Mumbai Local Ladies' Special: मध्य रेल्वेवर धावणार CSMT- Panvel, CSMT- Kalyan या दोन नव्या महिला विशेष लोकल

मध्य रेल्वे

भायखळा-विद्याविहार मार्गावर सकाळी 11.15 वाजल्यापासून दुपारी 3.45 वाजे पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यावेळेत भायखळा येथून पुढे धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल परेल, दादर, माटुंगा, कुर्ला येथे थांबतील मात्र चिंचपोकळी, करीरोड येथे ट्रेनची सेवा बंद असेल.

हार्बर रेल्वे

कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 वाजल्या पासून ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे, ब्लॉक काळात सीएसएमटी- वाशी/ पनवेल/ बेलापूर अशा सर्व लोकल रद्द असणार आहेत. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी काही विशेष गाड्या सुरु असतील, तसेच समान तिकीट आणि पासवर प्रवाशांना मेन लाईन आणि ट्रान्स हार्बर वरून प्रवास करता येणार आहे.

पहा ट्विट

पश्चिम रेल्वे

वसई रोड ते भाईंदर दरम्यान अप आणि डाऊन धीम्या रेल्वे मार्गावर सकाळी 11 पासून ते दुपारी 3 पर्यंत ब्लॉक घेतला जाईल. या वेळेत धीम्या मार्गावरील वाहतूक ही जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.

दरम्यान, आज ब्लॉक कालावधीत काही लोकलच्या फेऱ्या रद्द राहतील तर अन्य लोकल या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत, यामुळे नेहेमीपेक्षा किंचित अधिक गर्दी पाहायला मिळू शकते.