Megablock (Photo Credits:Twitter)

रेल्वे प्रशासनाने मुंबई लोकलच्या (Mumbai Local) तिन्ही मार्गावरील तांत्रिक कामासाठी आज रविवारी (Sunday Mega Block) मध्य रेल्वे (Central Railway), पश्चिम (Western Railway) आणि हार्बर लाईन (Harbour Line), मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. यामुळे लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत तर अन्य ठिकाणी लोकलचा उशिराने धावणार असल्याचे माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार , मध्य रेल्वेवर माटुंगा (Matunga) ते मुलुंड (Mulund) दरम्यान तर, हार्बर मार्गावर वडाळा रोड (Vadala Road) ते वाशी (Vashi) आणि पश्चिम मार्गावर सांताक्रूझ (Santacruz) ते गोरेगाव (Goregaon) या स्थानकांच्या मध्ये मेगा ब्लॉक असणार आहे. तसेच या दरम्यान रेल्वेतून प्रवाश करणाऱ्या प्रवाशांनी संपूर्ण वेळापत्रक पाहूनच नियोजन करावे, असे अवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मेगाब्लॉक वेळापत्रक

मध्य रेल्वे

मध्य रेल्वे वर माटुंगा ते मुलुंड स्थानकाच्या दरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. याकाळात कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन धिम्या मार्गावरून काढल्या जातील. तसेच सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकात देखील थांबणार आहेत. या सर्व सुविधा 15 ते 20 मिनिटे उशिराने असतील.

हार्बर लाईन

वडाळा रोड ते वाशी दरम्यान ये-जा करणाऱ्या दोन्ही मार्गावर सकाळी 11.10 पासून ते दुपारी 3.40 पर्यंत ब्लॉकचे नियोजन आहे. परिणामी या ब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल अशा दोन्ही मार्गावरील उपनगरी लोकलच्या फेऱ्या रद्द असतील. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नेहमीप्रमाणे पनवेल ते वाशी ते पनवेल दरम्यान विशेष उपनगरी रेल्वे चालवण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन अशा धिम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 दरम्यान जम्बोब्लॉक असणार आहे. या मुळे सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. राम मंदिर स्थानकात मात्र लोकल थांबणार नाहीत.

 

ट्वीट-

मागील दोन आठवड्यांपासून पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉकमुळे प्रवाशांना बराच दिलासा मिळाला होता मात्र उद्या पुन्हा एकदा ब्लॉक आणि परिणामी लोकलचा मंदावलेला वेग याचग सामना करावा लागणार आहे.