ग्राम विकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद (ZP) ग्रामीण आरोग्य विभाग महाराष्ट्राने (Maharshtra) आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक यासारख्या गट सी पदांसाठी अर्ज आमंत्रित (Vacancy) केले आहेत. विविध रिक्त पदे भरायची आहेत. यासाठी इच्छूक उमेदवारांनी अर्ज करावे. असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद मेगा भरती 2019 साठी नवीनतम अधिसूचना जारी केली होती. जिल्हा परिषदेने मार्च 2019 मध्ये आरोग्य विभागासाठी भरती जारी केली परंतु कोविड -19 महामारी परिस्थितीमुळे ती पुढे ढकलली गेली. जिल्हा परिषदेमार्फत 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे. ही परीक्षा ऑनलाइन (Online) स्वरूपात होणार आहे.
यासाठी शैक्षणिक पात्रता औषध निर्माता यासाठी B.Pharm/D.Pharm ची पदवी असणे गरजेचे आहे. तसेच MS-CIT/CCC हे संगणकीय ज्ञान असणे गरजेचे आहे. आरोग्य सेवक पदासाठी 10वी उत्तीर्ण तसेच संगणकीय ज्ञान हवे. आरोग्य सेविका पदासाठी सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद असावे. आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी आरोग्य कर्मचारी कोर्स केलेला असावा. प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी B.Sc ला फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी/जूलॉजी/माइक्रोबायोलॉजी हे विषय घेऊन पदवीधर असावा.
या परीक्षेसाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे असावी. ही पदे संपूर्ण महाराष्ट्र भरली जात आहेत. यासाठी नोंदणी फी खुला प्रवर्गासाठी 500 रुपये आहे. तर मागासवर्गीयांसाठी 250 रुपये आणि माजी सैनिकांसाठी मोफत असणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र 06 ते 15 ऑक्टोबर 2021 दरम्यान निघतील. हेही वाचा How to File ITR For FY 2020-21: यंदा 30 सप्टेंबर पूर्वी incometax.gov.in वर ई फाईलिंग कसं कराल?
जिल्हा परिषदसाठी अर्ज करताना कागदपत्रे पुर्ण असणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत, उमेदवाराला ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी तपशीलांसह तयार होणे आवश्यक आहे. वैयक्तिक तपशील जसे आधार कार्ड क्रमांक, जन्मतारीख, ईमेल आयडी, फोन नंबर, पत्ता तपशील, छायाचित्र आणि स्वाक्षरी आवश्यक आहे. SSC किंवा जन्म प्रमाणपत्रानुसार अर्जदाराचे नाव भरावे, कारण जर तुमच्या कोणत्याही अधिकृत ओळखपत्राशी नाव जुळत नसेल तर तुमचा अर्ज नाकारण्यात येईल.