कोरोना व्हायरस (Coronavirus) महारामारीसोबत लढताना महाराष्ट्र लॉकडाऊन (Lockdown) आहे. त्यामुळे नागरिकांच्या हालचालिंवर मर्यादा आल्या आहेत. दरम्यान, नोकरिसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात मेगा भरती (Mega Recruitment in Maharashtra Health Department) निघणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले राज्याच्या आरोग्य विभागात तबबल 16 हजार पदांची भरती (Recruitment 2021) प्रक्रिया पार पडणार आहे. या भरतीत प्रामुख्याने 'क' आणि 'ड' प्रवर्गातील पदांचा समावेश असणार आहे. 'ब' वर्गातील पदेही भरली जाणार आहेत. 'क' आणि 'ड' वर्गातील सुमारे 12,000 तर 'ब' वर्गातील 2000 आणि 2000 विशेषज्ञ अशी मिळून 16 हजार पदं आगामी काळात भरली जाणार आहेत, असे राजेश टोपे म्हणाले.
भरतीबाबत अधिक माहिती देताना टोपे यांनी सांगितले की, मंत्रिमंडळात झालेल्या ठरावानुसार, आरोग्य विभाग, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना या भरतीबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. राज्यातील परिस्थिती पाहता रुग्णसेवेशी संबंधित पदांची 100% भरती करण्याची आवश्यकता असल्याचे आम्ही मंत्रिमंडळ बैठकीत सांगितले. त्यावर मंत्रिमंडळाने ठरवले की याबाबतचा निर्णय आता आरोग्य विभाग, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या पातळविरच घ्यावा. त्यानुसार येत्या 1 ते 2 दिवसांत निर्णय घेतला जाईल. भरतीसाठी परीक्षाही लवकर घेतल्या जाव्यात अशी सरकारची भूमिका असल्याचे टोपे म्हणाले. (हेही वाचा, Maratha Reservation: मराठा आरक्षण रद्द झाल्याचा 'त्या' विद्यार्थ्यांना धोका नाही; पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा)
परीक्षा आणि भरती प्रक्रिया
- क आणि ड वर्गातील पदसंख्या - 12,000
- ब वर्गातील पदसंख्या - 2000 (डॉक्टर,मेडिकल ऑफिसर)
- स्पेशालिस्ट- 2000
- अ वर्गासाठीचे सिलेक्शन एमपीएससीकडे पाठवले जाईल.
- ब वर्गाच्या मुलाखती आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या माध्यमातून घेतल्या जातील.
- क आणि ड वर्गासाठी परीक्षा एजन्सीच्या माध्यमातून घेतली जाईल.
- महाराष्ट्र आणि देशाीतील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. काही अभ्यासकांनी
शानस पातळीवर संबंधित नोकर भरतीसाठी येत्या एकदोन दिवसांमध्ये निर्णय प्रक्रिया पार पाडली जाईल. या निर्णय प्रक्रियेनुसार भरती प्रक्रिया पार पाडली जाईल, असे राजेश टोपे म्हणाले. दरम्यान, देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते अशा इशारा दिला आहे. त्यानुसार राज्य सरकार आणि केंद्र सरकार सतर्क झाले असून उपाययोजना सुरु केल्या आहेत.