Mega Block Update: मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरून प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गाने आज शनिवारी आणि रविवारी दोन दिवस मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळ पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाला दोन दिवस लागणार आहे.त्यामुळे दोन दिवसांचा मेगाब्लॉक घेता येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणातही मेगाब्लॉक नसणार आहे.
कल्याण ते अंबरनाथ स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर शनिवार-रविवारी मध्यरात्री 1.20 वाजल्यापासून ते 3.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. गर्डर टाकण्याच्या कामासाठी लोकल सेवेत बदल करण्यात येणार आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळ गर्डर टाकण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. आज आणि उद्या दोन दिवस सीएसएमटीहून रात्री 11.51 वाजता अंबरनाथसाठी सुटणारी आहे.
तसेच अंबरनाथहून सीएसएमटी येथून अंबरनाथकडे रात्री 10.1आणि 10.15 वाजता सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे CSMT येथून मध्यरात्री 12.4 वाजता अंबरनाथसाठी सुटणारी लोकल कुर्ला स्थानाकंपर्यंत धावणार आहे. CSMT येथून रात्री 12.24 वाजता कर्जतसाठी सुटणारी लोकल ठाणे रेल्वेस्ठानका पर्यंत धावणार आहे. तर कर्जतहून रात्री 2.33 वाजता CSMT साठी सुटणारी लोकल ही ठाणे स्टेशनहून सुटेल.ही लोकल ट्रेन पहाटे 4.04 वाजता CSMT स्टेशनवर येईल.