Mumbai Local Mega Block: मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर उद्या मेगाब्लॉक
Mumbai Local Trains | Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: ANI)

उद्या रविवार, 25 जुलै रोजी मुंबई लोकलच्या (Mumbai Local) मेन मार्गावर मेगाब्लॉक (Mega Block) घोषित करण्यात आला आहे. बदलापूर, वांगणी आणि कर्जत येथे झालेल्या बिघाडाच्या दुरुस्तीसाठी हा मेगाब्लॉग घेण्यात आल्याचे मध्य रेल्वेचे सीपीआरओ शिवाजी सुतार (Central Railway CPRO Shivaji Sutar) यांनी सांगितले. मुंबई आणि उपगनरांमध्ये मागील आठवड्यापासून होत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वे सेवेलाही झाला होता. मात्र आता सर्व सेवा पूर्ववत झाल्याचेही त्यांनी सांगितले.

उपनगरातील मेन लाईन वर ठरवण्यात आलेला ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मात्र कर्जत आणि खोपोली दरम्यान दुरुस्तीचे काम चालू राहील. मुंबईहून पुणे आणि नाशिक च्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन्स सुरु राहणार आहेत. तसंच हार्बर, ट्रान्स हार्बर आणि मेन लाईनवरील लोकल सेवा पूर्ववत झाल्याचेही CPRO ने सांगितले.

22 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका घाट भागांना बसला होता. त्यामुळे घाटातील रेल्वे रुळांवर पाणी साचून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आमच्या टीमने अथक प्रयत्न करुन ठप्प पडलेली वाहतूक त्याच दिवशी पूर्ववत केली, असेही ते म्हणाले.

दरम्यान, राज्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच दरडी कोसळण्याच्या विविध घटना समोर येत आहेत. यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणि स्थानिकांकडून मदतकार्य अविरतपणे सुरु आहेत. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील पुरग्रस्त, दुर्घटनाग्रस्त भागांची पाहाणी करत आहेत. पीडितांना आर्थिक मदत करण्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे.