Megablock: मध्य आणि हार्बर या स्थानकादरम्यान मेगाब्लॉक; तर पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची आज ब्लॉक पासून सुटका
Mumbai local train | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईकरांना दर रविवारी सतावणारा प्रश्न म्हणजे मुंबई रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक (Megablock). सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेक लोक घराबाहेर पडतात. मात्र मेगाब्लॉकमुळे रेल्वे उशिराने धावत असल्याकारणाने ट्रेनला प्रचंड गर्दी पाहायला मिळते. म्हणून या मार्गाने प्रवास करण्यांसाठी आज कोणत्या मार्गांवर मेगाब्लॉक आहे हे आपण पाहणार आहोत. हे वेळापत्रक पाहून आज रेल्वेने कोणत्या मार्गाने प्रवास करावा याचा अंदाज येईल. आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक ठेवण्यात आला असून पश्चिम मार्गाच्या प्रवाशांची आज मेगाब्लॉकपासून सुटका झाली आहे. या मेगाब्लॉकमुळे लोकल फे-या सुमारे 20 मिनिटे उशिराने धावतील.

मेगाब्लॉकमुळे रविवारी रेल्वेने प्रवास करणा-या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात रेल्वे रद्द होणे, उशिराने धावणे अशा अनेक समस्यांमुळे रेल्वेमध्ये गर्दी पाहायला मिळते. म्हणूनच आजच्या मेगाब्लॉकमुळे मध्या आणि हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना कसा प्रवास करावा ते कळेल.

हेदेखील वाचा- पश्चिम मार्गावर आज रात्री ब्लॉक तर मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वे:

मध्य रेल्वेवर डाऊन मार्गावर आज सकाळी 11.20 ते दुपारी 3.50 पर्यंत मेगाब्लॉक पाहायला मिळेल. यामुळे माटुंगा-मुलुंड दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. तसेच यामुळे काही लोकल फे-या रद्द करण्यात आलाय् असून काही फे-या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावतील.

हेदेखील वाचा- रेल्वे तिकीट आरक्षणासाठी नियमात बदल, जाणून घ्या कोणत्या गोष्टीसाठी किती रुपये स्विकारणार

हार्बर रेल्वे:

अप-डाऊन मार्गावर वडाळा रोड ते वाशी दरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगाब्लॉक पाहायला मिळेल. यामुळे काही लोकल फे-या रद्द होतील. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल-वाशी-पनवेल मार्गावर विशेष फे-या चालविण्यात येतील.

तसेच हार्बर मार्गावरील गर्दी विभागण्यासाठी प्रवाशांना तिकिट, पासवर सकाळी 10 ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत मध्य, ट्रान्सहार्बरवरही प्रवास करण्याची मुभा आहे.