Mumbai Local | Photo Credits: Unsplash.com

Mumbai Local Updates: महाराष्ट्रामध्ये सध्या लॉकडाऊन असला तरीही मुंबईकरांच्या सोयीसाठी काही प्रमाणात लोकल ट्रेन्स सुरू करण्यात आल्या आहेत. रेल्वे सेवा सुरळीत रहावी याकरिता मेंटेनन्स काम पार पाडण्यासाठी या रविवारी देखील लोकलच्या मध्य, हार्बर, पश्चिम, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे. हा ब्लॉक सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असल्याने या काळात रेल्वेसेवा वेळापत्रकानुसार चालवली जाणार नाही. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. Mumbai Local Trains: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सामान्यांनाही लोकलमधून प्रवास करता येणार? मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली 'अशी' माहिती.

मध्य रेल्वे मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 पर्यंत माटुंगा ते मुलुंड या रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असेल. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव या स्थानकादरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत स्लो मार्गावर मेगाब्लॉक आहे. हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे मार्गावर 11 ते 4 मेगाब्लॉक असेल.

मध्य  रेल्वे ट्वीट 

मेगब्लॉक दरम्यान मध्य रेल्वे मार्गावर ट्रेन वेळापत्रकाच्या वेळेच्या 15 मिनिटं उशिरा ट्रेन धावतील फास्ट ट्रॅकऐवजी स्लो ट्रॅकवर ट्रेन वळवल्या जातील आणि सायन-मुलुंड दरम्यान प्रत्येक स्थानकावर त्या थांबतील. अप मार्गावर देखिल मुलुंड दादर दरम्यान सार्‍या स्टेशनवर गाड्या थांबतील. दरम्यान सीएसएमटी ते वाशी दरम्यान मेगाब्लॉकच्या काळात ट्रेन सुरू राहतील. तर ट्रान्स हार्बरवर ठाणे वाशी सेवा सुरळीत सुरू असेल.