Mumbai Western Railway Mega Block: आज पश्चिम रेल्वेचा 11 तासांचा मेगाब्लॉक, रात्री 9.44 ला सुटणार शेवटची लोकल
Mumbai local | (Archived and representative images)

Mumbai Western Railway Mega Block: डिलाई रोड येथील लोअर परेल पुलाच्या बांधकामासाठी शनिवार (2 फेब्रुवारी) आणि रविवारी (3 फेब्रुवारी) या दोन दिवशी लोकल ट्रेनसाठी 11 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. तर काल रात्री 10 वाजल्यापासून ते 3 फेब्रुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार असल्याचे सांगितले आहे. या मेगाब्लॉक दरम्यान प्रवाशांचे नाहक हाल होणार आहेत.

दरम्यान, जलद मार्गावरील उपनगरीय गाड्या दादर आणि विरार/ डहाणू रोड स्टेशन दरमान्य धवणार आहे. तर धिम्या मार्गावरील उपनगरीय गाड्या बांद्रा-बोरिवली/भाईंदर/विरार दरम्यान सुरु असणार आहेत. मात्र जलद मार्गावरील उपनगरीय सेवा आणि चर्चगेट-बांद्रा दरम्यानच्या धिम्या मार्गावरील सेवा परिचालित होणार नाही. त्यामुळे खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवाशांनी घराबाहेर पडावे.(हेही वाचा-Mumbai Western Railway Mega Block: 2-3 फेब्रुवारी दिवशी पश्चिम रेल्वेच्या 11 तास मेगाब्लॉक दरम्यान बेस्ट चालवणार चर्चगेट-दादर दरम्यान खास बससेवा, पहा वेळापत्रक)

अंधेरीच्या गोखले पुलाची पादचारी मार्गिका कोसळल्यानंतर प्रसाशानाने धोकादायक पुलांचे काम हाती घेतले. यात लोअर परळचा डेलीस पूल गंजला असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता या पुलाचा सांगाडा काढण्यासाठी शनिवार, 2 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजल्यापासून रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत तब्बल 11 तासांचा पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 10 पासूनच ब्लॉकमध्ये चर्चगेट ते दादर ही वाहतूक 11 तासांसाठी संपूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे