
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये मीरा वाघिणीचा मृत्यू झाला आहे. मीरा ही माया या प्रसिद्ध वाघिणीची बछडी होती. मीराचं वय अंदाजे 2 वर्ष होतं व तिचा मृतदेह आज (सोमवार) सकाळी पंचधारा परिसराजवळ आढळला आहे.
सोमवारी सकाळी वनविभाग अधिकारी पंचधारा परिसरात गस्त घालत असताना त्यांना मीराचा मृतदेह आढळला व म. टा. शी बोलताना त्यांनी मिरच्या मृतदेहाचे सर्व अवयव शाबूत असल्याचे सांगितले आहे.
रानगवा किंवा रानडुकरांची शिकार करत असताना हा हल्ला मिरावर झाल्याचे बोलले जात आहे.
माया आणि तिची दोन बछडी
ताडोबा व्याघ्र प्रकल्प देशातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे. त्यातील माया वाघीण ही सर्वांच्याच परिचयाची आहे. तिला आणि मटकासुर या वाघाला दोन वर्षांपर्वी मीरा आणि सूर्य ही दोन बछडी झाली. नॅशनल जिओग्राफी या चॅनेलने माया आणि तिच्या 2 बछड्यांवर डॉक्युमेंटरी देखील शूट केली आहे. आता मात्र मीराच्या मृत्यूची बातमी कळताच प्राणी प्रेमींनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली आहे.