मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मतोश्री जवळील परिसर सील करण्यात आलेले वृत्त चुकीचे; मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती
मातोश्री बंगला (Photo Credits-ANI)

कोरोना विषाणूने (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळल्याने राज्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे. यातच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून महाराष्ट्रातील 200 हून अधिक भाग सील करण्यात आले आहेत. यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान मातोश्री (Matoshree) जवळील परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने संबंधित परिसर सील करण्यात आले आहे, अशी बातमी सर्वत्र वृत्तवाहिनींवर झळकत आहे. मात्र, मातोश्री जवळील कोणताही भाग सील करण्यात आला नसल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. मातोश्रीच्या गेट क्रमांक 2 जवळ असलेल्या PWD च्या गेस्ट हाउसजवळ हा रुग्ण आढळला आहे. यामुळे मातोश्रीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंगरक्षकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे, अशीही माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या वाढते आहे. मुंबई येथे आतापर्यंत 490 रुग्ण आढळून आले आहेत. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री ज्या भागात आहे, त्याच परिसरात एका व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. ही बातमी समजताच हा भाग सील करण्यात आला आहे,अशी बातमी सर्वच वृतवाहिनीवर झळकत होती. परंतु, या बातमीत तथ्थ नसून ही माहिती चुकीची आहे, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेने नुकतीच दिली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: भारतात गेल्या 24 तासात 704 नवे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आकडा 4281 वर पोहचला

एएनआयचे ट्वीट- 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. त्यांनी त्यावेळीही सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहन केले होते. तसेच गरज पडल्यास घराबाहेर पडू नका असेही म्हटले होते. आता मातोश्री परिसरातच करोनाचा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.