MCA CET 2020 Exam कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लांबणीवर;  mahacet.org वर लवकरच जाहीर होईल नवं वेळापत्रक
Representational Image (Photo Credits: unsplash.com)

महाराष्ट्रात वाढता कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता आता अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान 30 एप्रिलला होणारी MCA CET 2020 exam देखील रद्द झाली आहे. यापूर्वी ही परीक्षा 28 मार्चला होणार होती. मात्र आता कोरोच्या पार्श्वभूमीवर 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने सीईटीची परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील पुढील स्थितीचा आढावा घेऊन लवकरच नवी तारीख जाहीर केली जाईल अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. दरम्यान यापूर्वीच MAH B.P.Ed. CET, 2020, MAH B.Ed. M.Ed. Integrated Course CET 2020, MAH M.P.Ed. CET 2020, MAH BA/B.Sc. B.Ed.च्या प्रवेश प्रकियेच्या अर्ज दाखल करण्याची मुदत देखील वाढवण्यात आली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर दिल्या जाणार्‍या माहितीवर लक्ष ठेवावं असं आवाहनदेखील करण्यात आलं आहे.

भारतासह महाराष्ट्रातून कोरोना व्हायरस लॉकडाऊन उठवल्यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षेची नवी तारीख समजू शकेल. mahacet.org यावर याबाबत अधिकृत माहिती दिली जाते. सध्या भारतामध्ये 14 एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊनचा पहिला टप्पा संपल्यानंतर आता किमान 3 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा आहे. याकाळात शाळा, कॉलेज पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आज गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. सीईटीच्या परीक्षांप्रमाणेच देशातील अनेक महत्त्वाच्या परीक्षांचं, नोकरभरतीच्या परीक्षांचं वेळापत्रक कोलमडलं आहे. कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान JNU, UGC NET, PhD, NEET, TTE च्या प्रवेश परीक्षा लांबणीवर.

भारतामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 2801 वर पोहचला आहे. आज गेल्या 24 तासात कोरोना व्हायरस बाधित नव्या 117 रुग्णांची नोंद झाली. यातील 66 रुग्ण हे मुंबई (Mumbai) शहरातील आहेत. तर उर्वरीत रुग्ण 44 पुणे (Pune) जिल्ह्यातील आहेत.