Mumbai Tram (Photo Credits: Twitter)

ब्रिटिश काळात परिवहनासाठी वापरली जाणारी 'ट्राम' (Tram) आता मुंबईकरांना पाहता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) समोरच्या भाटिया उद्यानामध्ये (Bhartiya Udyan) ही ट्राम बसवण्यात आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kisori Pednekar) यांच्या हस्ते ट्रामचे लोकापर्ण करण्यात आले आहे. मेट्रो, मोनो रेलच्या काळात वाहतुकीची अनेक साधनं उपलब्ध असल्याने ही ट्राम मुंबईच्या रस्त्यांवर धावणार नाही. मात्र मुंबईकरांना आणि बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांना ऐतिहासिक ट्राम अनुभवता यावी, यासाठी बीएमसीने हे पाऊल उचलले आहे.

जुन्या ट्रामचे पार्ट्स एकत्र करुन ही नवी ट्राम तयार करण्यात आली आहे. यात समोरासमोर तोंड करुन बसण्याची व्यवस्था होती. तर यातून केवळ 32 प्रवासी बसून आणि 8 प्रवासी उभे राहून प्रवास करु शकत होते. त्याचबरोबर या ट्राम उभी राहून चालवली जात असे. त्यामुळे ट्राम चालकाची प्रतिकृतीही त्यात पाहायला मिळते.

पहा फोटोज:

पुढच्या पीढीला ट्रामविषयी माहिती देण्यासाठी मुंबईतील भाटिया उद्यानाला भेट देण्यास काहीच हरकत नाही. दरम्यान, पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने राज्य सरकार महत्त्वूपूर्ण पाऊलं उचलत आहे. यापूर्वी 'तुरुंग पर्यटन' सुरु करण्यात आलं होतं. तर बीएमसीचे मुख्यालयाची हेरिटेज इमारत आतून पाहण्याची संधीही पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे.