मटका किंग रतन खत्री यांंचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन
Matka King Ratan Khatri (Photo Credits: Facebook)

मटका किंग रतन खत्री (Ratan Khatri) यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील नवजीवन सोसायटी मधील राहत्या घरात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. खत्री यांना मागील काही काळापासून अनेक आजार जडले होते तसेच वृद्धापकाळाने त्यांचे शरीर बरेच अशक्त झाले होते. तरीही त्यांनी बरेच दिवस मृत्यूला झुंज दिली मात्र आज अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. 1960 च्या काळात त्यांनी कल्याण भगत यांच्यासोबत मुंबईत मटक्याचा धंदा सुरू केला होता. भगत यांच्यासोबत सुरुवातील ते मॅनेजर म्हणून काम करत होते. 1964 साली त्यांनी भागात यांच्यापासून विभक्त होऊन स्वतःचा रतन मटका सुरु केला. आज खत्री यांच्या निधनाने या क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रतन खत्री यांनी मटका हा प्रकार खूप प्रसिद्ध केला होता. रतन खत्री हे खरंतर पाकिस्तानातील कराची येथून फाळणीनंतर मुंबईत स्थलांतर केलेले एक सिंधी तरुण नाव होते काहीच कालावधीत त्यांनी छोटे-मोठे उद्योग करता-करता मुंबईत ‘मटका किंग’ अशी ओळख बनवली होती. रतन खत्री यांच्या जीवनावर ‘धर्मात्मा’ हा चित्रपट आला तर ‘रंगीला रतन’ हा चित्रपट रतन खत्री यांनी स्वत: निर्माण केलेला चित्रपट होता.

दरम्यान, सट्टा, मटका किंवा लॉटरी हा खेळ स्वातंत्र्यांच्या पूर्वीपासूनच मुंबईत प्रसिद्ध आहे. सुरुवातीच्या काळात न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजमधून कापसाचे दरवाजे उघडणे व बंद करणे यावर पैसे लावले जायचे. 1960 च्या दशकात मटका हा मुंबईतील सर्वच वर्गात लोकप्रिय झाला होता अनेक तरुणांचा हा मुख्य आकर्षणाचा मुद्दा ठरायचा. मटका किंवा एका भांड्यात चिट्सवरून चिठ्ठी काढणे या प्रकारातून त्याही काळात दररोज 1 कोटी रुपयांची उलाढाल व्हायची.