Matheran Tourism | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Matheran Tourism News: दलाल आणि घोडेस्वारी घडवून आणणाऱ्या मालकांकडून पर्यटकांची फसवणूक आणि जास्त शुल्क आकारण्याच्या आरोपांमुळे सर्व पर्यटन उपक्रम थांबवलेला माथेरान बंद (Matheran Strike) अखेर मागे घेण्यात आला आहे. बेमदत सुरु असलेला हा बंद अखेर दोन दिवसांनी मागे घेण्यात आला. स्थानिक नागरिक आणि दलला व घोडेमालक यांच्यात प्रशासनाने घडवून आणलेल्या चर्चेनंतर वादावर तोडगा निघाला. दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी हा वाद निवडळा जावा यासाठी प्रयत्न केल्यानंतर आयोजित बैठकीमध्ये चर्चा झाली आणि हा बंद मागे घेण्यात आला. प्रशासनाशी यशस्वी चर्चेनंतर, आजपासून म्हणजेच गुरुवार (20 मार्च) पासून या लोकप्रिय हिल स्टेशनवरील पर्यटन उपक्रम पुन्हा सुरू होतील.

आमदारांच्या हस्तक्षेपानंतर तोडगा

माथेरान पर्यटन वाचवा संघर्ष समिती (MPVSS) ने सुरू केलेल्या या बंदचा उद्देश पर्यटकांना निराश करणाऱ्या आणि प्रदेशाच्या पर्यटनावर परिणाम करणाऱ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या घोटाळ्यांवर प्रकाश टाकणे हा होता. या बंदला जवळपास सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, स्थानिक संघटना, ई रिक्षा संघटना, हात रिक्षा संघटना आणि हॉटेल आणि व्यापारी असोसिएशन यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे हा बंद व्यापक प्रमाणावर यशस्वी होताना दिसत होता. अखेर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी हस्तक्षेप करून निदर्शक आणि प्रशासन यांच्यात बैठक आयोजित केल्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आले. (हेही वाचा, Matheran Strike: पर्यटकांच्या फसवणुकीविरुद्ध रहिवाशांकडून आंदोलन; माथेरान पर्यटन अनिश्चित काळासाठी बंद)

  • माथेरान हिल स्टेशन नगर परिषदेचे माजी अध्यक्ष मनोज खेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, 'प्रशासनाने आमच्या चिंतांना सकारात्मक प्रतिसाद दिला, ज्यामुळे निदर्शने मागे घेण्यात आली'
  • पर्यटन पुन्हा सुरू झाल्याने स्थानिक व्यवसाय, पर्यटक आणि आतिथ्य क्षेत्रांना दिलासा मिळाला आहे, विशेषतः उन्हाळी हंगाम सुरू होत असताना. हिल स्टेशनमध्ये पुढील गैरप्रकार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी आता कृतींवर लक्ष ठेवणे आणि नियमन करणे अपेक्षित अशी भावना स्थानिक व्यक्त करतात. (हेही वाचा, Matheran Tourism: घोडेस्वारांकडून जास्त भाडे आकार, स्थानिकांनी अनिश्चित काळासाठी बंदची हाक, माथेरान पर्यटनाला फटका)

बैठकीतील प्रमुख मागण्या

  • दस्तुरीनाका येथे पर्यटन सुविधा केंद्र सुरु करा.
  • परिसरात वाहनतळ, दस्तुरीनाका परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे.
  • रिक्षा आणि इतर दरपत्रक दिसेल अशा ठिकाणी लावणे.
  • र्यटकांसाठी सूचना फलक बसविणे.
  • माथेरानसाठी प्रवेशमार्ग निश्चित करणे.
  • पर्यटकांची फसवणूक रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलणे.
  • समन्वयासाठी एका समितीची स्थापनेवर एकमत.

पर्यटन स्थळाविषयी थोडक्यात

माथेरान हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात वसलेले एक आकर्षक हिल स्टेशन आहे. हिरवळ, शांत वातावरण आणि वसाहतकालीन आकर्षणासाठी ओळखले जाणारे हे निसर्गप्रेमी आणि शहरी जीवनाच्या धावपळीतून विश्रांती घेऊ इच्छिणाऱ्या शहरवासीयांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. माथेरान हे अद्वितीय आहे कारण ते एक पर्यावरण-संवेदनशील प्रदेश आहे, त्याच्या शुद्ध वातावरणाचे रक्षण करण्यासाठी वाहनांवर बंदी आहे. यामुळे ते आशियातील काही ऑटोमोबाईल-मुक्त हिल स्टेशनपैकी एक बनते!

समुद्रसपाटीपासून सुमारे 800 मीटर (2,625 फूट) उंचीवर वसलेले, माथेरान आजूबाजूच्या दऱ्या आणि जंगलांचे डोळ्यांना आनंद वाटावा अशी नैसर्गिक दृश्ये देते. त्याच्या काही लोकप्रिय आकर्षणांमध्ये पॅनोरमा पॉइंट, इको पॉइंट, शार्लोट लेक आणि लुईसा पॉइंट यांचा समावेश आहे. माथेरानला नेरळशी जोडणारी टॉय ट्रेनची सवारी देखील एक खास आणि निसर्गरम्य अनुभव, असल्याचे पर्यटक सांगतात.