Maratha youth Suicide: मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावरुन समाज आक्रमक झाला असताना सुरु असलेले आत्महत्येचे सत्रही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. या आधी अनेक युवकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आत्महत्या केल आहे. यावर आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी आत्महत्या करु नका असे अवानह केले असे असतानाही आज (मंगळवार, 31 ऑक्टोबर) पुन्हा एका युवकाने आत्महत्या केली आहे. सकाळी 7.32 च्या सुमारास ही घटना पुढे आली. सागर भाऊसाहेब वाले (वय-27) असे या युवकाचे नाव आहे. तो संगमनेर (Sangamner) तालुक्यातील झोळे गावचा राहणारा आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहीलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. ज्यात त्याने आपण आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
सागर भाऊसाहेब वाळे याच्या मृत्यूची पोलिसांनी दखल घेतली असून तपास सुरु केला आहे. दरम्यान, संगमनेर तालुका पोलिसांमध्ये या मृत्यूची नोंद आकस्मात मृत्यू अशी करण्यात आली आहे. सागर याने आत्महत्येपूर्वी लिहीलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. या चिठ्ठीमध्ये त्याने, आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा अशी घोषणा लिहीली आहे. तसेच, आम्हाला आरक्षण नसल्यानेच मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूप्रकरणी कोणालाही दोषी धरु नये, असे लिहीले असल्याचे पोलीसांनी म्हटले आहे.
दरम्यान, सागर याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्याने गळफास घेतल्याचे लक्षात येताच त्याला घलेवाडी येथील ग्रामीण रुग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळउडाली आहे.
मराठा लढवय्या आहे. आरक्षण आपण लढवून मिळवू. त्यासाठी कोणीही आत्महत्या करु नये. तूम्ही जर आत्महत्या करायला लागला तर आरक्षण मिळाल्यावर ते घेणार कोण? आणि ज्यांच्यासाठी लढा सुरु केला आहे तेच जर राहिले नाही तर त्या आरक्षणाचा उपयोग तरी काय? असा आर्त सवाल उपस्थित करत मनोज जरांगे यांनी समाजाच्या कोणत्याच तरुणाने आत्महत्या करु नये. आत्महत्या करुन आरक्षण मिळणार नाही. आरक्षण मिळवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला लढवेच लागेल. लढून आरक्षण मिळवणे हाच एकमेव उपाय आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि विविध पक्षांच्या इतर राजकीय नेत्यांनीही मराठा समाजातील तरुणांना आरक्षणासाठी आत्महत्या न करण्याचे अवाहन केले आहे. असे असले तरी आतापर्यंत अनेक तरुणांनी आरक्षणाच्या मागणी साठी आत्महत्या केल्या आहेत.