मराठा आरक्षण (संग्रहित प्रतिमा)

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek ) सोहळा यंदाही गतवर्षीप्रमाणेच रायगडावर साजरा करण्याचे नियोजन आहे. येत्या 6 जून रोजी हा सोहळा पार पडणार आहे, असा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीस राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव , रधुनाथ चित्रे पाटील , सचिन अडेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. ही बैठक आज (2 जून) पार पडली. या बैठकीस राज्याभिषेक सोहळ्यासाठी मराठे रायगडावर जाणार असल्याचे या बोलले जात आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्राप्त माहितीनुसार मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत अनेक मुद्दे चर्चेला आले. शिवराज्याभिषेक सोहळ्यास शिवभक्तांनी मोठ्या संख्येने रायगडावर हजर राहावे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी जाणाऱ्या शिवभक्तांची पोलिसांनी अडवणूक करु नये. बहुसंख्येने शिवभक्त मराठे रायगडावर जमतील असेही या बैठकीत ठरल्याचे, मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले. (हेही वाचा, 10% EWS Reservation To Maratha Students: मराठा समाजातील विद्यार्थी, उमेदवारांना 10 टक्के EWS आरक्षण लाभ देण्याचा सरकारचा निर्णय )

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यानंतर मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ही अस्वस्थात समजून घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रभर दौरे केले. या दौऱ्यात सत्ताधारी, विरोधी असलेल्या अशा अनेक नेत्यांची भेट घेतली. या भेटींनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी 6 जून या दिवशी रायगडावरुन आपली भूमिका स्पष्ट करु असा इशारा संभाजीराजे यांनी दिला होता. त्यामुळे आता रायगडावरुन संभाजीराजे छत्रपती काय भूमिका स्पष्ट करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.