मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावरुन सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजपला काँग्रेसने (Congress) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरुन जोरदार टोला लगावत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) व कंगना रनौत (Kangana Ranaut) यांना भेटायला वेळ देतात परंतू, ते संभाजीराजे छत्रपती यांना भेटायला वेळ देत नाहीत. पंतप्रधानांनी कोणाला भेटावे याबाबत आक्षेप नाही. परंतू, पंतप्रधानांनी संभाजीराजेंना (Chhatrapati Sambhaji Raje ) भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान मात्र आहे, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही टीका केली आहे.
सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''प्रियांका चोप्रा व कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजी राजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते. या अभिनेत्री कोणते प्रश्न घेऊन भेटल्या? कोणास भेटावे हा आक्षेप नाही. संभाजीराजेंना भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान मात्र आहे''. पुढच्या ट्विटमध्ये सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, ''महाराष्ट्रातील बॉलिवूड बद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणा-या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे.'' (हेही वाचा, Maratha Reservation: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विषयांची समज कमी, त्यांना मराठा आरक्षण विषयच कळला नाही- काँग्रेस)
चंद्रकांत दादा,
प्रियांका चोप्रा व कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजी राजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते. या अभिनेत्री कोणते प्रश्न घेऊन भेटल्या? कोणास भेटावे हा आक्षेप नाही. संभाजीराजेंना भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान मात्र आहे. pic.twitter.com/RsCxq6EyE8
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 25, 2021
सचिन सावंत यांनी या आधीही चंद्रकांत पाटील आणि भाजपवर मराठा आरक्षणावरुन जोरदार हल्ला बोल केला होता. सचिन सावंत यांनी कालच (24 मे) केलेल्या ट्विटमध्य म्हटले होते की, मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत 1) मोदींची विषयांची समज फार कमी आहे. 2) मोदींना मराठा आरक्षण हा विषय समजलाच नाही. 3) छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे.
महाराष्ट्रातील बॉलिवूड बद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणा-या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे. pic.twitter.com/L9I3AC664C
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 25, 2021
दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त करताना संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठा आरक्षणाबाबत आतापर्यंत चार वेळा वेळ मागीतली. चार पत्रं दिली. परंतू, पंतप्रधान मोदी यांनी यांनी एकदाही वेळ दिली नाही. संभाजीराजे छत्रपती यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते की, मराठा आरक्षणविषयी भारतीय जनता पक्ष सर्वोतोपरी प्रयत्न करतणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते की, मराठा आरक्षण हा विषय राज्याचा आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात थेट भेट होऊ शकली नाही.