पदव्युत्तर मेडिकल प्रवेशप्रक्रीयेत यंदा मराठा आरक्षण नाहीच; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
Maratha Reservation | Archived, Edited, Representative Images

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 16% आरक्षण डिसेंबर 2018 मध्ये देण्यात आलं. मात्र या आरक्षणाचा फायदा यंदाच्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना होणार नाही. कारण यंदाच्या शैक्षणिक वर्षात मराठा आरक्षण वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी (Postgraduate Medical Admission) आरक्षण लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही आरक्षण लागू न करण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेल्या राज्य सरकारला या निर्णयाने चांगलाच दणका दिला आहे. (Maharashtra PG Medical Admission 2019 प्रवेशप्रक्रियेत यंदा मराठा आरक्षण लागू होणार नाही- हायकोर्ट)

सर्वोच्च न्यायालयाकडून दिल्या गेलेल्या या निर्णयानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसंच मराठा समाजातील विद्यार्थ्यांकडून या निर्णयानंतर नाराजीचा सूर व्यक्त केला जात  आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण देण्यावर डॉ. आदिती गुप्ता, डॉ. अनुज लद्दड, डॉ. रशिका सराफ यांच्यासह इतर उमेदवारांनी आक्षेप घेत नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने देखील नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे.