Maratha Reservation : मनोज जरांगे समर्थकावर जीवघेणा हल्ला, डोक्याला गंभीर दुखापत; बीडच्या गेवराईतील घटना
Photo Credit - X

Maratha Reservation : मराठा आरक्षण(Maratha Reservation)चा मुद्दा मध्यंतरीच्या काळात आक्रमक झाला होता. अनेक मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातच आता मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचे समर्थक असलेल्या एकावर जीवघेणा हल्ला (Attack) करण्यात आला. सोमवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. अमोल खुणे असे दगडफेक झालेल्या मनोज जरांगे समर्थकाचे नाव आहे. झालेल्या दगडफेकीत त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. रात्रीच्या अंधारात आरोपी दबा धरून बसले होते. खुणे यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी तेथून तातडीने फरार झाले. सध्या खुणे यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा :Maratha Reservation: मराठा आरक्षणाला तातडीची स्थगिती देण्यास Bombay High Court चा नकार )

मिळालेल्या माहितीनुसार, कोपर्डी अत्याचारातील आरोपीवर हल्ला केल्याप्रकरणी अमोल खुणे हे दोन वर्ष जेलमध्ये होते. जेलमधून बाहेर आल्यावर ते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आरक्षणाच्या लढ्यासाठी काम करत आहेत. अमोल खुणे हे मुळचे धानोरा गावचे रहिवासी आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास ते गेवराईहून आपल्या गावी धानोरा येथे जात होते. मात्र, तेव्हा तीन-चार जण त्यांच्यावर दबा धरून बसले होते. खुणे तेथे येताच आरोपींनी अचानक दगडफेक केली. त्या दगडफेकीमध्ये अमोल खुणे गंबीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. मात्र, कोणत्या कारणावरून खुणे यांच्यावर दगडफेक करण्यात आली हो समोर आलेले नाही. (हेही वाचा : Mumbai HC on Maratha Reservation: मराठा आरक्षण हायकोर्टाच्या निर्देशात जायबंदी, राज्य सरकारला दणका )

दगडफेक झाल्यानंतर ते जखमी अवस्थेत रस्त्यावरच होते. त्यामुळे ही घटना काही काळातच स्थानिक नागरिकांना समजली. त्यांनी खुणे यांना उपचारांसाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले. तर, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. अनेक आत्तापर्यंत मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.