Laxman Hake And Manoj Jarange Patil | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलातील प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे मूळ गाव असलेल्या बीड (Beed) जिल्ह्यातील मातेरी (Matori Village) येथे दगडफेक (Stone Pelting) झाल्याची घटना घडली आहे. डीजे (DJ) वाजविण्याच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले. दरम्यान, मातोरी गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, गावच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर रात्रभर रस्तारोखो सुरु होते.

लक्ष्मण हाके यांची अभिवादन यात्रा बीडमध्ये

ओबीसी आरक्षण प्रश्नावर लढणारे प्रा. लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि आबासाहेब वाघमारे यांनी काढलेली अभिवदन यात्रा काल (गुरुवार, 27 जून) बीड येथे आली होती. तेथे त्यांनी रात्रीच्या वेळी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. हा त्यांचा पूर्वनियोजीत दौरा होता. याच दौऱ्यात ते भगवानगडावर जाऊन भगवानबाबाचेही दर्शन घेणार होते. दरम्यान, तत्पूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्या गावात दगडफेकीची घटना घडली आणि परिसरात तणाव निर्माण झाला. परिणामी मातेरी गावच्या दोन्ही दिशेला म्हणजेच बीड आणि नगर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रस्तारोखो रात्रभर सुरु होते. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला होता. (हेही वाचा, Laxman Hake Jalna Hunger Strike: लक्ष्मण हाके यांचे उपोषण स्थगित, राज्य सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय)

कायदा हातात घेऊ नये, लक्ष्मण आहे यांचे अवाहन

दरम्यान, बीड जिल्ह्यातील तेलगाव तेलगाव येथे बोलताना लक्ष्मण हाके यांनी सर्वांना शांततेचे अवाहन केले. ते म्हणाले, आरक्षणाचे संरक्षण करणारे आणि ते मागणारे अशा दोघांनीही कायदा हातात घेऊ नये. गावातील शांतता अबादीत राहिली पाहिजे. कोणीही गावची शांतता बिघडवू नये. हा काळ लाठ्याकाठ्या घेण्याचा नाही. लाठ्याकाठ्या घेण्याचा काळ गेला, असे सांगतानाच हाके यांनी मातेरी गावात झालेल्या दगडफेकीचाही निषेध केला. (हेही वाचा, Chhagan Bhujbal on Ajit Pawar: अजित पवार यांच्यामुळे भाजपला फटका; छगन भुजबळ यांच्याकडून स्फोटक वक्तव्य; सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीवरुनही नाराजी)

पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, तरुणांनो डोके शांत ठेवा. आम्ही आंदोलन आणि उपोषणाच्या माध्यमातून आरक्षण मागण्यासाठी प्रयत्न करत आहोत. राज्यघटनेने आपल्याला हक्कासाठी लढण्याची आयुधं दिली आहेत. त्यामुळे उगाचच कोणाची गाडी फोड, दहशत माजव, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कर, असे काही करु नका. तसे करणाऱ्या सर्व प्रकाराचा मी निषेध करतो. संविधानावर विश्वास ठेवा, कोणतीही भीती मनात बाळगू नका, पोलिसांनीही कायदा व सुव्यवस्था चोख राहण्यासाठी पावले उचलायला हवीत. तसेच, आपणास रोज एकमेकांची तोंडे पाहायची असल्याचेही लक्ष्मण हाके यांनी या वेळी सांगितले.