Maratha Reservation (Photo Credits: File Photo)

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा खवळून उठला असून जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार तोपर्यंत आपण शांत बसणार अशी भूमिका घेतली आहे. त्याच धर्तीवर आज तुळजापूरात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या (Maratha Kranti Thok Morcha) तिस-या पर्वाला सुरुवात होणार आहे. आतापर्यंत मराठा आरक्षण मुद्द्यावर योग्य ती निर्णय व्हावा या मागणीसाठी अनेक मोर्चे, आंदोलने झाली. मात्र सरकार अजूनही यावर गंभीर नसल्याचे सांगत मराठा समाजाने आपली भूमिका आणि मोर्चेबांधणी अधिकच तीव्र करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

छत्रपति शिवाजी चौकातून या मोर्च्याला सुरुवात होणार असून तुळजाभवानी परिसरात या मोर्च्याच्या समारोप होईल. या मोर्च्यामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाजाचे लोक सहभागी होणार आहेत.

हेदेखील वाचा-Maratha Reservation: मराठा संघटनांचा 10 ऑक्टोबरचा महाराष्ट्र बंद तूर्तास मागे

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे याचा अंतिम निकाल लागत नाही राज्य सरकारने युपीएससी, एमपीएससीच्या परीक्षा घेऊ नये अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी केली होती. मात्र तरीही सरकारने या परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. यामुळे ज्या ज्या ठिकाणी या परीक्षा होतील तेथे तेथे जाऊन या उधळवून लावण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान काल (8 ऑक्टोबर) रात्री उशिरा मराठा समाजाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आता संघटनांनी 10 ऑक्टोबरला दिलेल्या महाराष्ट्र बंदला तूर्तास स्थगिती दिली आहे. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काही महा विकास आघाडीमधील मंत्री उपस्थित होते.