राज्यात मागील काही काळापासून गाजत असलेलं मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी (Mansukh Hiren Death Case) संशयात अडकलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांची अखेर बदली करण्यात आली आहे. गुन्हे बुद्धिमत्ता युनिट (Crime Intelligence Unit) मधून मुंबई पोलिस मुख्यालयातील (Mumbai Police Headquarters) नागरिक सुविधा केंद्रात (Citizen Facilitation Centre) आज त्यांची बदली करण्यात आली आहे. काल रात्री पोलिस मुख्यालयातून सचिना वाझे यांच्या बदलीचे आदेश काडण्यात आले.
उद्योपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर हिरेन यांचे कुटुंबिय आणि विरोधकांनी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. सचिन वाझे यांच्या निलंबनाची, अटकेची मागणी जोर धरु लागली. त्यानंतर सचिन वाझे यांच्या बदलीची घोषणा गृहमंत्र्यांनी केली.
ANI Tweet:
Maharashtra: Mumbai police officer Sachin Vaze transferred from Crime Intelligence Unit (CIU) to Citizen Facilitation Centre at Mumbai Police Headquarters.
— ANI (@ANI) March 12, 2021
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच गाजला. भाजपच्या नेत्यांनी सचिन वाझे प्रकरणावर अधिवेशनात एकच गदारोळ केला. भाजप आमदारांनी विधापरिषदेबाहेर सचिन वाझे यांना निलंबित करण्यासाठी निर्देशने केली. विरोधकांच्या आक्रमकतेनंतर अखेर सचिन वाझे यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सचिन वाझे यांनी दोन दिवस पोलिस आयुक्तांशी चर्चा केली. अखेर आज त्यांची बदली करण्यात आली आहे. (Mansukh Hiren Case: मनसुख हिरेन प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया, काय म्हणाले? घ्या जाणून)
या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथक (ATS) करत असून सचिन वाझे यांची चौकशीही करण्यात आली आहे. दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं सापडल्या प्रकरणाचा तपास NIA करत आहे.