Mansukh Hiren Death Case: महाराष्ट्र एटीएसने (ATS) अँन्टेलिया प्रकरणी संबंधित असलेल्या मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणाचा गुंता सुटल्याचे स्पष्ट केले आहे. याबद्दल डीआयजी एटीएस शिवदीप लांडे यांनी माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले की, मुंबई पोलीसातील निलंबित शिपाई विनायक शिंदे आणि बुकी नरेश धारे यांना हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी अटक केली आहे. एका अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, हिरने यांच्या मृ्त्यूप्रकरणी या दोन्ही आरोपींना शनिवारी एटीएस मुख्यालयात बोलावले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. शिंदे, लखन भैय्या बनावट चकमकी प्रकरणात दोषी ठरले होते. तर गेल्या वर्षी तो काही दिवसांसाठी तुरूंगातून बाहेर आला होता.
या दोघांना अशा वेळी अटक करण्यात आली जेव्हा केंद्रीय गृहमंत्रालयाने हिरेन यांचे मृत्यूप्रकरण NIA यांना दिले. तो पर्यंत मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएस कडून करण्यात येत होता. एनआयए, अँन्टेलियाच्या बाहेर मिळालेल्या स्फोटकांनी भरलेली कार आणि सचिन वाझे प्रकरणी तपास करत आहे. अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, राज्यातील एटीएसकडून आतापर्यंत बहुतांश जणांची चौकशी केली आहे. ज्यामध्ये मृत हिरेन यांचा परिवार आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या दोघांच्या अटकेनंतर मोठे यश मिळाले आहे.(Ambani House Bomb Scare: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ पार्क करून इनोव्हाने पळ काढणाऱ्या संशयित आरोपीने वापरलेली कार मुंबई पोलिसांची, तपासात धक्कादायक खुलासा)
Tweet:
Mansukh Hiren's death case has been solved: DIG Maharashtra ATS Shivdeep Lande.
Suspended Mumbai Police constable Vinayak Shinde and Naresh Dhare, a bookie were arrested in connection with the death earlier today.
— ANI (@ANI) March 21, 2021
दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार ही मनसुख हिरेन यांची असल्याचे समोर आले होते. मात्र त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती आणि त्यांचा मृतदेह ठाणे येथे मिळाला होता. एनआयए मुंबई मध्ये मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 20 जिलेटीनच्या कांड्या आणि एक धमकवणाऱ्या नोटीसह सापडलेल्या एसयुवीचा तपास करत होती. ही घटना 25 फेब्रुवारीची आहे. शिवसेनेने मनसुख हिरेन यांच्या मुलाच्या हवाल्याने असे म्हटले होते की, मनसुख हिरेन उत्तम स्विमर होते आणि आत्महत्या करण्यांमधील नव्हते.