Mangalsutra Swallowed By Buffalo: म्हशीने गिळलं 25 ग्रॅम किमतीचं मंगळसूत्र; 2 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर मिळवलं परत, Watch Video
Mangalsutra Swallowed By Buffalo (PC - ANI/Twitter)

Mangalsutra Swallowed By Buffalo: वाशिम (Washim) मध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका म्हशीने दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र गिळलं आहे. म्हशीवर 2 तासांची शस्त्रक्रिया करून मंगळसूत्र यशस्वीरित्या काढण्यात आले आहे. वाशिममधील सरसी गावातील एका महिलेने गेल्या आठवड्यात रात्री झोपण्यापूर्वी तिचे मंगळसूत्र एका प्लेटमध्ये ठेवले. दुसर्‍या दिवशी तिने त्यांच्या म्हशींना त्याच ताटात सोयाबीनचे भुस दिले. म्हशीने चाऱ्यासह मंगळसूत्र खाल्ले.

काही वेळाने गीताबाई भोयर या महिलेला आपले मंगळसूत्र गहाळ झाल्याचे समजले. सुरुवातीला सोने बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांना संशय आला. तेव्हा गीताबाईंनी शोध सुरू केला. काही वेळाने तिला मंगळसूत्र ठेवलेल्या ताटात म्हशीला सोयाबीनचे भुसे दिल्याचे आठवले. भोयर कुटुंबीयांसह नीट पाहणी केली असता म्हशीने सोयाबीनचे भुसे खाल्ल्याचे लक्षात आले. मात्र सोन्याचे मंगळसूत्र गायब झाल्याचं भोयर कुटुंबियांच्या लक्षात आले. म्हशींच्या आरोग्याची काळजी घेत त्यांनी पशुवैद्यकांचा सल्ला घेतला. अल्ट्रासाऊंडच्या साहाय्याने म्हशीच्या पोटातील गहाळ वस्तू सापडली नाही. त्यानंतर त्यांनी मेटल डिटेक्टरचा वापर केला. त्यानंतर तिच्या पोटात सोनं असल्याची पुष्टी झाली. गोंधळलेल्या आणि काळजीत असलेल्या कुटुंबाने शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला. (हेही वाचा -Mumbai News: विक्रोळीतील जेव्हीएलआर पुलावर अपघातात बीएमसीच्या वरिष्ठ कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू)

दरम्यान, 28 सप्टेंबर रोजी केलेल्या शस्त्रक्रियेत डॉक्टरांना म्हशीच्या पोटात सोन्याचे मंगळसूत्र सापडले. 2 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर, म्हशीला 60-65 टाके पडल्यामुळे ती आता काळजीपूर्वक निरीक्षणाखाली आहे. या घटनेने वाशिम जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.