मांढर देवीची यात्रा रद्द (Photo Credits-Facebook)

Mandhardevi Yatra: कोरोना व्हायरसमुळे गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे आता पुन्हा एकदा सुरु करण्यास परवानगी दिली गेली आहे. मात्र यावेळी सुद्धा कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन ही केले गेल आहे. तर काही मंदिराच्या प्रशासनांनी त्यांच्या यात्रा सुद्धा कोरोनामुळे गर्दी होऊ नये म्हणून रद्द केल्या आहेत. यातच आता वाईतील मांढर देवीची यात्रा सुद्धा रद्द करण्यात आली आहे. या महिन्यात 27,28 आणि 29 दिवशी देवीची मुख्य यात्रा आहे. परंतु मंदिर 13 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत बंद राहणार असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मांढर देवीची यात्रेदरम्यान धार्मिक विधी, पूजा या परंपरेने चालत आलेल्या पद्धतीने पार पडणार आहे. परंतु त्यावेळी मोजक्याच जणांच्या उपस्थितीत म्हणजेच मंदिराचे ट्रस्टी, मंदिरातील पुजारी आणि ग्रामस्थ यांचा सहभाग असणार आहे. या देवीच्या यात्रेता राज्यातील विविध ठिकाणाहून जवळजवळ लाखो भाविक येतात. तसेच ही यात्रा महिनाभर सुरु असते. पण यंदा कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे ती रद्द केल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Happy New Year 2021: नववर्षाच्या स्वागतासाठी सजले पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर Watch Video)

यात्रेमुळे गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उत्सव रद्द केला आहे. तसेच जिल्ह्यात यात्रा किंवा कोणत्याही प्रकारच्या जत्रेला परवानगी नाकारलेली नाही. देवीच्या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याचे पाहता तो रद्द करण्यात आला. तसेच स्थानिक नागरिकांनी सुद्धा यात्रेवेळी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.