Money (Representational Image) (Photo Credits: Pixabay)

मुंबई लोकलची गर्दी पाहता नागरिकांना प्रवास करणे थोडे कठीणच असते. या गर्दीत कोणाचे पाकिट मारले जाते तर कोणाचा मोबाईल. अशा घटना तर लोकलमध्ये होतच राहतात. परंतु मुंबईतील लोकलमध्ये 2006 मध्ये एका व्यक्तिच्या पाकिट हरवले होते. त्यामध्ये 900 रुपये सुद्धा होते. मात्र हेच जे पाकिट हरवले होते ते पोलिसांना तब्बल 14 वर्षांनी मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे.

हेमंत पडळकर यांचे पाकिट छत्रपती शिवाजी महाराज येथून प्रवासादरम्यान 2006 मध्ये हरवले असल्याचे जीआरपी अधिकाऱ्यांनी रविवारी म्हटले आहे.

वाशी मधील जीआरपी यांना एप्रिल महिन्यात पाकिट मिळाल्याचा फोन आला. परंतु कोरोना व्हायरसमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व्यक्तीने हरवलेले पाकिट जीआरपी यांच्याकडून घेतले नाही. पण पनवेल मधील पडळकर यांनी आता निर्बंध शिथील झाल्यानंतर आता ते पाकिट जीआरपी यांच्याकडून घेतले आहेत.(कौतुकास्पद! कोरोना मुळे वडील गमावलेल्या डॉक्टरने कोरोनावर मात करुन तीन वेळा केले प्लाझ्मा दान)

पडळकर यांच्या पाकिटात 900 रुपये होते. त्यात 500 रुपयांची सुद्धा नोट होती. परंतु नोटबंदी झाल्यामुळे वाशी जीआरपी यांनी 300 रुपये परत केल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे. यामधील 100 रुपये हे स्टॅम्प पेपरसाठी घेण्यात आले. तर 500 रुपयांची नोट ही बदलून करुन पुन्हा दिली जाणार आहे. तसेच जीआरपीच्या ऑफिसात पाकिट घेण्यासाठी गेलो असता तेथे आणखी व्यक्ती सुद्धा त्यांच्या हरविलेल्या गोष्टी घेण्यासाठी आले होते. मात्र पडळकर यांनी त्यांना पाकिट मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. पडळकर यांच्या पाकिट चोरी करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा काही दिवसांनी ताब्यात घेतले जाईल असे जीआरपी अधिकाऱ्यांनी  म्हटले आहे. चोरट्याला पडळकर यांच्या पाकिटात 900 रुपये आढळले. यामधील 300 रुपये पडळकर यांना दिले असून त्यांना काही दिवसांनी परत करण्यात येणार आहेत.