Rail Accident in Mumbai: सिद्धेश्वर एक्सप्रेस मध्ये मोबाईल चोराला पकडण्याच्या नादात प्रवाशाने गमावला जीव
Death/ Murder Representative Image Pixabay

सिद्धेश्वर एक्सप्रेस (Siddheshwar Express) मध्ये एका प्रवाशाने मोबाईल चोराला पकडण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःचा जीव गमावला आहे. 24 वर्षीय प्रभास भांगे असं या प्रवासाचं नाव आहे. मोबाईल चोराला पकडण्यासाठी त्याने ट्रेनमधून उडी मारली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. प्रभास हा पुण्याचा बॅंक कर्मचारी होता. सुरूवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचं वाटत होतं मात्र नंतर हा प्रकार चोरीच्या प्रयत्नामधून झाल्याचं समोर आलं आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट नुसार, कल्याणच्या जीआरपी ने संशयित मोबाईल चोराला पकडल्यानंतर हा प्रकार मंगळवारी प्रकाशझोकात आला. 27 वर्षीय आकाश जाधव असं मोबाईल चोराचं नाव आहे. पोलिसांच्या चौकशी मध्ये आकाश जाधवने भांगेचा मोबाईल चोरल्याचं म्हणाला. प्रवासी दारावर उभा असताना त्याने मोबाईल खेचल्याचं सांगितलं. त्याने प्रवासी भांगेच्या हातावर हल्ला करून मोबाईल खेचल्याचं सांगितलं.

जीआरपी ने तपासामध्ये भांगेचा फोन या हल्ल्यामध्ये खाली पडल्याचं त्यांना समजलं. पोलिसांनी आकाश जाधव या आरोपी विरूद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यामध्ये कलम 304, 382 चा समावेश आहे.

भांगे हा मूळचा मुंबई चा रहिवासी होता. नंतर तो पुण्याला शिफ्ट झाला. तेथे एका खाजगी बॅंकेमध्ये तो कॅशियर म्हणून दोन वर्षांपासून काम करत होता. होळी साजरी करण्यासाठी तो मुंबई मध्ये आला होता. सिद्धेश्वर एक्सप्रेसने पुन्हा पुण्याला जात असताना त्याच्यासोबत हा प्रकार घडला. पोलिसांच्या माहितीनुसार भांगे धावत्या गाडीतून खाली उतरला आणि गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू पावला.

सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली होती, मात्र मंगळवारी आकाश जाधवला आंबिवली रेल्वे स्थानकावर पकडण्यात आल्याने घटना स्पष्ट झाली.