![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/09/Untitled-design-2022-09-06T105445.516-380x214.jpg)
ठाण्यामध्ये (Thane) एका 29 वर्षीय व्यक्तीचा इलेक्ट्रिक शॉक लागून धक्कादायक मृत्यू झाला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना फायर ऑफिशिएल कडून ही माहिती देण्यात आली आहे. ही घटना सोमवार 5 सप्टेंबर दिवशी सकाळी 9.30 च्या सुमाराची आहे. Vijay Bodade असं मृत व्यक्तीचं नाव आहे. विजय उल्हासनगर टाऊनशीप (Ulhasnagar Township) मध्ये शाळेजवळच्या कॅम्प नंबर 4 वरून चालत होता तेव्हा त्याला हा धक्का लागला.
दरम्यान विजय जेव्हा पॉवर सप्लाय लाईनच्या ओपन जनरेटर बॉक्स जवळ आला तेव्हा जबर वीजेचा धक्का बसला आणि तो खाली कोसळला. स्थानिकांनी हा प्रकार पाहून त्याला नजिकच्या रूग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला तेव्हाच मृत घोषित केले.
विजयचा मृतदेह मृतदेह नजिकच्या सरकारी रूग्णालयात नेला आहे. विठ्ठलवाडी पोलिसांनी अपघाती निधनाची केस दाखल करून घेतली आहे. हे देखिल नक्की वाचा: Shocking! रात्री मोबाईल फोन चार्जरला लावून झोपली होती तरुणी; विजेचा धक्का बसून झाला मृत्यू .
नाशिक मध्ये काही दिवसांपूर्वी आईस्क्रिम खायला गेलेल्या चिमुकलीचा देखील दुकानात फ्रिजला वीजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी बाब समोर आली होती.