
Man Bites Off Friend's Ear: ठाण्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. हिरानंदानी इस्टेट पाटलीपाडा (Hiranandani Estate Patlipada) येथे राहणाऱ्या ठाण्यातील एका व्यक्तीने बुधवारी रागाच्या भरात त्याच्या मित्राच्या कानाचा एक भाग चावला आणि नंतर तो गिळून टाकला. हिरानंदानी इस्टेटमधील सॉलिटेअर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये पार्टी झाल्यानंतर ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित, 37 वर्षीय चित्रपट निर्माता श्रवण लीखा आणि 32 वर्षीय आयटी व्यावसायिक, दोघेही हिरानंदानी इस्टेटमध्ये राहतात.
पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, बुधवारी सकाळी तो त्याच्या दोन मित्रांसोबत हिरानंदानी इस्टेटमधील सॉलिटेअर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका पार्टीत होता. त्यावेळी त्याचा एका मित्रासोबत वाद झाला. वादादरम्यान, त्याच्या मित्राला अचानक राग आला आणि त्याने लीखाच्या कानाचा एक भाग चावला आणि तो गिळून टाकला. (हेही वाचा - Chikhaldara Horror: अंधश्रद्धेचा कळस! श्वसन रोग बरा करण्यासाठी 22 दिवसांच्या बाळाला गरम विळ्याने दिले 65 वेळा चटके; प्रकृती गंभीर, चिखलदरा तालुक्यातील धक्कादायक घटना)
दरम्यान, तीव्र वेदना होत असलेल्या लीखा यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. आवश्यक उपचार घेतल्यानंतर, ते या घटनेची तक्रार करण्यासाठी कासारवडवली पोलिस ठाण्यात गेले. लीखा यांनी सांगितले की, तो माझा मित्र होता. किरकोळ वादानंतर त्याने हे कृत्य केले. आता, मला कानावर दोन शस्त्रक्रिया कराव्या लागतील, ज्यासाठी 4-5 लाख रुपये खर्च येईल. आतापर्यंत, डॉक्टरांनी फक्त कानाची मलमपट्टी केली आहे. (हेही वाचा: नवरात्रीत श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा! देवीची पूजा करताना तरुणीने तलवारीने कापली आपली जीभ; Madhya Pradesh मधील धक्कादायक घटना)
तथापी, कासारवडवली पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. दरम्यान, इंदूर येथेही अशीच एक घटना घडली होती. सोमवारी राऊ येथील एका वाइन शॉपमध्ये झालेल्या भांडणानंतर एका व्यक्तीने दुसऱ्याचा कान चावला होता. पीडित व्यक्ती दारू खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर एबी रोडवरील आयपीएस कॉलेजजवळील वाइन शॉपमध्ये ही घटना घडली होती.