ऑनलाईन ऑर्डर केलेल्या जेवणात सापडले प्लास्टिक; झोमॅटो डिलिव्हरी बॉयने पार्सलमध्ये बदल केल्याचा हॉटेल मालकाचा आरोप
Plastic in Food (Photo Credits: ANI)

औरंगाबाद (Aurangabad) येथे राहणाऱ्या सचिन जामधरे (Sachin Jamdhare) या ग्राहकाने झॉमेटोवरुन (Zomato) पनीर चिली मागवली. मात्र ऑर्डर घरी येताच त्यात प्लास्टिकचे तुकडे निघाले. या धक्कादायक प्रकारानंतर ग्राहकाने जिन्सी पोलिस ठाण्यात झोमॅटो आणि हॉटेल विरोधात तक्रार दाखल केली आहे.

सचिन जामधरे यांनी काल संध्याकाळी झोमॅटोवरुन पनीर चिली आणि इतर काही पदार्थ ऑर्डर केले. ऑर्डर घरी आल्यानंतर पनीर तुटत नसल्याने त्यांनी नीट तपासून पाहिले असता ते पनीर नसून प्लास्टिक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आहे. खराब वातावरणातील निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवल्याने स्विगी, फूडपांडा, झोमॅटोला नोटीस

 याबद्दल सचिन जामधरे यांनी सांगितले की, "जेवत असताना माझ्या मुलीला पनीर खूप कडक लागले. म्हणून मी ते नीट तपासून पाहिले. तेव्हा मला त्यात प्लॉस्टिक असल्याचे जाणवले."

याबद्दल हॉटेल मालकाकडे विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाही. उलट झोमॅटो डिलिव्हरी बॉयने पार्सल बदलले असेल आणि मीच झोमॅटो विराधोता तक्रार केल्याचे सांगितले. त्यानंतर ग्राहक जगधडे यांनी पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तसंच हा प्लास्टिकचा पदार्थ एफडीए कडे तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा पार्सल उघडून खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पुन्हा असे होणार नाही आणि अन्नाची सुरक्षा लक्षात घेतली जाईल, असे झोमॅटोकडून सांगण्यात आले. या प्रसंगानंतर संबंधित डिलिव्हरी बॉयला कामावरुन काढून टाकण्यात आले.