झोमॅटोच्या (Zomato) एका डिलिव्हरी बॉयने घरपोच सेवा देताना एका ऑर्डरच्या डब्ब्यातील अन्न खाल्ल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. याप्रकरणानंतर झोमॅटोने या गोष्टीची गंभीर दखल घेत भविष्यात अशाप्रकारची चूक होणार नसल्याचे जाहीर केलं आहे. तसेच यासाठी टेम्पर प्रुफ टेप (Tamper Proof Tapes) वापरण्यात येईल असेदेखील एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.
We take food tampering very seriously.
For more details: https://t.co/hBApiTzmcI
— Zomato (@Zomato) December 10, 2018
झोमॅटोने जाहीर केलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये व्हायरल झालेला व्हिडिओ हा भारतातील मदुराई भागातील असल्याचं म्हटलं आहे. संबंधित डिलिव्हरी बॉयला कामावरून काढून टाकले असून भविष्यात ग्राहकांना अशाप्रकारच्या त्रासाचा सामना करावा लागू नये म्हणून आता टेम्पर प्रुफ टेप लावून पार्सल दिले जाईल असे झोमॅटोकडून सांगण्यात आले आहे. Video: Zomato चे पार्सल घेऊन येणाऱ्या तरुणाचा पाहा प्रताप