पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर (Mamata Banerjee in Maharashtra) आहेत. आज (30 नोव्हेंबर) त्यांचे मुंबई येथे आगमन झाले. ममता बॅनर्जी यांनी आज मुंबई सिद्धिवीनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर त्यांनी 'जय मराठा, जय बांग्ला' अशी घोषणा दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीला आराम मिळावा यासाठी आपण मुंबई सिद्धिविनायकाकडे प्रार्थना केली.' राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या तुकाराम आंबोळे यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केले.
दरम्यान, हॉटेल ट्रायडंट येथे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांचे स्वागत केले. ममता बॅनर्जी आणि शिवसेना यांचे वेगळे नाते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांचेही एक वेगळे नाते आहे. त्या मुख्यमंत्र्यांना भेटू इच्छित होत्या. परंतू भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्यीची भेट घेणे आणि स्वागत करणे स्वाभाविक आहे. मला स्वतःहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटण्यासाठी पाठवलं. मी शुभेच्छा देखील दिल्या आणि त्यांनी एक शुभ संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी दिलेला आहे. (हेही वाचा, Mamata Banerjee Mumbai Visit: ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशीही करणार चर्चा)
ममता बॅनर्जी यांनी श्री सिद्धिविनायक मंदिरात गणपीतीच मनोभावे पूजा केली. दर्शनासाठी चांगील सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी मंदिर व्यवस्थापन आणि राज्य सरकारचे आभार मानले. आपणास इथे आल्यानंतर आनंद वाटला. चांगल्या सुविधेबद्दल मी मंदिर समितीचे, ट्रस्टीचे, पंडित, गुरुजी आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानते, असेही त्या म्हणाल्या.
सिद्धिविनायक मंदिर दर्शन आणि तुकाराम आंबोळे यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन निघाल्यानंतर त्या हॉटेल ट्रायडंट येथे पोहोचल्या. पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हॉटेल ट्रायडंट येथे ममता यांची भेट घेतली. दरम्यान, ममता बॅनर्जी या उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी जाणार आहेत.
Maharashtra Minister and Shiv Sena leader Aaditya Thackeray and party leader Sanjay Raut met West Bengal CM and TMC chief Mamata Banerjee today in Mumbai. pic.twitter.com/yGcZ1sT9Ck
— ANI (@ANI) November 30, 2021
देशातील राजकीय स्थिती प्रचंड वेगाने बदलत आहे. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पर्यायाने भाजप सरकारबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दुसऱ्या बाजूला सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला अद्यापही पुरेसा अवकाश सापडला नाही. त्यामुळे देशात एक राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. अशा स्थितीत देशात तिसरी आघाडी उदयास येण्याची शक्यात वर्तवली जात आहे. भाजपने लावलेली ताकद उलटून लावत ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल राज्यात एकहाती सत्ता मिळवली. त्यामुळे आगामी काळात ममता बॅनर्जी या राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.