मालेगाव ब्लास्ट प्रकरणातील आरोपी समीर कुलकर्णी (Samir Kulkarni) याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार समीरने एक पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली आहे. या पत्रामध्ये समीरने त्याच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह सातही आरोपींवरील आरोप निश्चित
ANI Tweet
Malegaon 2008 blast accused Samir Kulkarni has written a letter to Maharashtra CM demanding security. Sameer Kulkarni was released on bail in October 2017. He has not specified the threat to him but has requested CM for security cover on an urgent basis.
— ANI (@ANI) May 11, 2019
समीर हा 2008 च्या मालेगाव ब्लास्ट प्रकरणातील एक आरोपी आहे. ऑक्टोबर 2017 पासून त्याला जामीनावर सोडण्यात आले आहे. सध्या त्याच्या जीवाला धोका असल्याचं सांगत त्याने तात्काळ सुरक्षा मिळावी अशी मागणी केली आहे. मात्र कोणत्या स्वरूपाचा धोका आहे याबाबत खुलासा केलेला नाही.
साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या समर्थनार्थ लोकसभा निवडणूक प्रचारात उतरणार असल्याचं म्हटलं होतं पण हेमंत करकरे यांच्या हौतात्म्यावरून वादग्रस्त विधानानंतर टीकादेखील झाली होती. समीर कुलकर्णीने साध्वीचं व्यक्तव्य भोगलेल्या यातनेतून आलं असावं असे म्हटले आहे.