विधानसभा निवडणूक निकाल 2019: देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील सहित 'या' 3 बड्या नेत्यांची लढत होतीचुरशीची , इतक्या फरकाने मिळवला विजय
Big Fights In Assembly Election 2019 (Photo Credits: File)

संपुर्ण महाराष्ट्राला ज्या निकालाची उत्सुकता लागली होती तो विधानसभा निवडणुकीचा ऐतिहासिक निकाल 24 ऑक्टोबरला अखेर लागला. हा निकाल काहींसाठी अपेक्षित होता तर काहींसाठी खूप धक्कादायक असा होता. या निकालाने राजकारणाचे संपुर्ण चित्र बदलून टाकले. या निकालात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे (Eknath Shinde), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) या दिग्गज नेत्यांच्या विरोधात जे उमेदवार उभे होते त्यांच्यासाठी ही लढत म्हणजे जणू बिग फाइटच होती. जरी या 5 उमेदवार विजयी झाले असले तरीही ही लढत त्यांच्यासाठी म्हणावी तितकी सोपी नव्हती. कारण मतांची टक्केवारी आणि मतांची आकडेवारीतील फरक हा अतिशय अटीतटीचा होता.

यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपूर दक्षिण-पश्चिम मधून उभे राहिलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. यांच्या विरुद्ध उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ.आशिष देशमुख हे केवळ 49,228 मतांनी पराभूत झाले. फडणवीस यांची आतापर्यंतची कारकिर्द पाहता मतांमधील ही तफावत किंवा त्यांना मिळालेली 1,08,926 ही फारच कमी असल्याचे दिसून येत आहे. तसेच परळीतून निवडून आलेले धनंजय मुंडे हे खूप कमी फरकाने निवडून आले आहेत. या निवडणुकीत त्यांना 1,21,555 मते तर त्यांच्या विरोधात उभे असलेल्या भाजपच्या पंकजा मुंडे यांना 91,031 मतं मिळाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव ओसरला? दमदार सभा झालेल्या ठिकाणी भाजप उमेदवार पराभूत

असेच काहीसे चित्र कोथरूड मतदारसंघातून पाहायला मिळाले आहे. या मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना 1,05,151 मतं मिळाली. या निवडणुकीत त्यांना टक्कर देणारे आणि मतमोजणीच्या पहिल्या काही फेरीत आघाडीवर असलेले मनसेचे अॅड. किशोर शिंदे यांना 79,670 मतं मिळाली.

तर दुसरीकडे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून निवडून आलेले एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय घाडीगावकर यांच्या मधील मतांची तफावत ही जरी जास्त असली तरी त्यांना याहून अधिक मतं मिळण्याची अपेक्षा होती. तसेच चित्र शिर्डी मतदारसंघात पाहायला मिळेल.

थोडक्यात ही लढत या 5 दिग्गज नेत्यांसाठी म्हणावी तितकी सोपी नव्हती तशी समाधानकारकही नव्हती. मात्र विजय हा शेवटी विजय असतो हे नाकारताही येत नाही, नाही का?