मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहे. त्यांचा पक्ष महायुतीमध्ये सहभागी होईल, असं सांगितलं जात आहे. राज ठाकरे हे सोमवारी रात्री तडकाफडकी चार्टर्ड विमानाने दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. दिल्लीत आज महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अगोदरच दिल्लीत जाऊन पोहोचले आहेत. मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे भाजपसोबत जातील, असं बोललं जात आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. (हेही वाचा - Praniti Shinde : भाजपच्या पोस्टरवर प्रणिती शिंदेंचा फोटो, नवीन पक्षाचा मुहूर्त कधी?; 'वंचित'चं ट्विट)
काही दिवसांपूर्वी भाजपकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा ही मनसेसाठी सोडली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. परंतु, दरवेळीप्रमाणे भाजप-मनसे युतीची चर्चा हवेतच विरणार, असे अनेकांना वाटले होते. मात्र, मंगळवारी रात्री राज ठाकरे दिल्लीला रवाना झाल्याने दोन्ही पक्षांमधील युतीबाबत काहीतरी महत्तवपुर्ण घटना घडण्याची शक्यता आहे.
आजच्या बैठकीचं विशेष गोष्ट राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हेदेखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ही जागावाटपाची बैठक भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात होत आहे. या बैठकीत राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र येथील जागावाटपांचा निर्णय होणार आहे. राज्यातील जागावाटपांचा तिढा सोडवण्यात येणार आहे. लोकसभेसह विधानसभेत पण समाधानकारक जागा देण्याचे सुद्धा आश्वासन भाजपकडून देण्यात येण्याची शक्यता आहे.