Praniti Shinde : वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे( Praniti Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रणिती शिंदे या भाजपच्या वाटेवर असल्याचं म्हणत, भाजप आणि त्यांचा फोटो असलेले पोस्टर वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) त्यांच्या अधिकृत ट्विटरवर (Twitter) पोस्ट केले आहे. “तुम्ही ठीक आहात? आम्हाला समजले आहे की, इतके दिवस थांबल्यानंतरही तुमचे तुमच्या पक्षासोबत जमत नाही. नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे?”, असा सवाल वंचितने प्रणिती शिंदे यांना केला आहे. त्यावर अद्याप प्रणिती शिंदेंकडून कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही. (हेही वाचा: Praniti Shinde on Corona Vaccine : 'कोरोना व्हॅक्सिनमुळे लोकांना हृदयविकाराचा त्रास सुरु झाला'; प्रणिती शिंदे भाजपवर आक्रमक)
पोस्टमध्ये वंचितकडून पुढे लिहीण्यात आले आहे की, “आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही. आम्ही महाराष्ट्रातील वंचित – बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो. असो, या सर्व गोष्टी बंद करा.” अशा आशयाच्या पोस्टमुळे विरोधकांमधील एकजूटतेवर पुन्हा प्रश्न चिन्ह उभे राहीले आहे. (हेही वाचा:Sushilkumar Shinde, प्रणिती शिंदे यांना भाजपा मध्ये येण्याची ऑफर; सुशील कुमार शिंदेंनी स्वतःच केला गौप्यस्फोट)
रविवारी प्रणिती शिंदे यांनी त्याच्या वक्त्यातून नाव न घेता वंचितवर निशाणा साधला होता. त्या म्हणाल्या होत्या की, “गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला कमी मतदान झालं होतं, जो पक्ष काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न करतो तो भाजपला मदत करतो, डॅमेज करतो त्यामुळे कोणीही निवडून येत नाही. ज्यामुळे जो विरोधात आहे, तो निवडून येतो म्हणून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका”, यावरून वंचित बहुजन आघाडीने प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
ताई, तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक.
आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही.
आम्ही महाराष्ट्रातील वंचित - बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो.
असो, या सर्व गोष्टी… pic.twitter.com/vifYxfMQ2Q
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) March 18, 2024